अभिमानास्पद ! अमरावतीच्या पोलीस शिपायाला ‘या’ करण्यासाठी पाठवलं विदेशात

महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलिस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवलेची घटना ही तशी विरळच. पण अमरावती ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर यांना नुकतच सेवा देण्यासाठी विदेशात पाठवण्यात आलं आहे.
‘आय.ए.एस, आय.एफ.एस.’ दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवले जाते. मात्र अशाच प्रकारे सेवा देण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई विकास अंजिकर यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी दिली आहे.
अधिकार्‍यांप्रमाणेच पोलीस दलातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना विदेशात सेवा देण्यासाठी पाठविण्यात येते. याच योजनेअंतर्गत विकास अंजीकर यांची तीन वर्षासाठी ‘फॉरेन डेप्युटेशन’ वर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन सांगतात पोलीस दलातील शिपायांना विदेशात सेवेची संधी मिळावी याकरिता ही योजना आहे. आतापर्यंत केलेल्या पोलीस सेवेतील शेरे, सेवा व कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेकरिता नियुक्ती करण्यात येते. याकरिता दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रातून कर्मचाऱ्याला ट्रेनिंग देण्यात येते व मुलाखत घेऊन अंतिम सिलेक्शन होते. ही नियुक्ती तीन वर्षाकरिता असते. अमरावती ग्रामीण पोलीस दलाची शिपाई पुढील तीन वर्ष विदेशात जाऊन ‘सिक्युरिटी असिस्टंट’ म्हणून सेवा देणार आहेत.

विदेशात सेवा देण्यासाठी निवड झालेली पोलीस शिपाई विकास अंजिकर सांगतात विदेशात जाऊन भारत मातेसाठी प्रामाणिकपणे सेवा करण्याची मिळालेली संधी आहे असे विकास अंजिरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *