नगरोत्थान महाभियानांतर्गत अमरावती शहराच्या रस्ते विकासाच्या १५० कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी

  • सुरक्षित, अपघातविरहित व गतिशील वाहतुकीसाठी आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे प्रयत्न आले फळास
  • नागरी भागात पायाभूत सुविधा व त्यांचा दर्जा वाढविण्याला प्राधान्य – आ. सौ. सुलभाताई खोडके

अमरावती १२ मार्च : अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून दररोज वाढती वाहनांची गर्दी पाहता शहरात रस्ते विकासाला प्राधान्य देत आ. सौ.सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने शहरात सुरक्षित व अपघात विरहित वाहतुकीच्या सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहे. त्या दृष्टिकोनातून काँक्रीट रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे सर्वदूर पसरत असल्याने शहरातील अंतर्गत रस्ते , प्रमुख मार्ग व जिल्हा प्रमुख मार्ग हे अत्याधुनिक व सुसज्य अशा काँक्रिटीकारणानें कात टाकत असल्याने रस्त्यांना नवी चकाकी आली आहे. याच ;शुंखलेत नगरोत्थान अभियान अंतर्गत अमरावती महानगर पालिका रस्ते विकासाचा १५० कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात यावा यासाठी अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते पूर्वी या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याला घेऊन आमदार महोदयांनी शासनाकडे पाठपुरावा केला असता , फलश्रुती म्ह्णून शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने नगरोत्थान महाभियानांतर्गत अमरावती शहराच्या रस्ते विकासाच्या १५० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या संदर्भात नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी करून कामांच्या निविदा प्रक्रिया व कार्यादेश व कार्यान्वयन आदी संदर्भातील कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्या संदर्भात निर्देशित केले आहे.

अमरावती महानगर पालिका रस्ते विकास प्रकल्पांतर्गत नवसारी पासून ते पाठ्यपुस्तक ते राममोहन नगर व नवसारी पासून ते पंजाबराव देशमुख को- ऑपरेटीव्ह बँक ते वली चौक पर्यंतचा रस्ता, नवसारी अम्मन बोअरवेल पासून ते कठोरा नाका रस्ता , शेंगाव नाका रहाटगांव रोड पासून ते सात बंगला ते पुलापर्यंतचा रस्ता , गाडगे नगर ते तपोवन पासून ते सात बंगला व मालू ले आऊट पर्यंतचा रस्ता, तसेच गाडगेनगर -तपोवन पासून राजमाता कॉलनी ते आयटीआय कॉलेज रोड पर्यंतचा रस्ता , शेंगाव नाका रहांटगांव कडून जावरकर लॉन रिंग रोड पर्यंतचा रास्ता , या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व दोन्ही बाजूंना नाली व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. या कामांमध्ये शासनाच्या वित्तीय आकृतीबंधानुसार ७० टक्के वाटा शासन उचलणार असून अमरावती महानगर पालिका ३० टक्के भार उचलणार आहे.

नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता नगरोत्थान अभियानातंर्गत अमरावती महानगर पालिका रस्ते विकास योजनेचा प्रकल्प राबवून त्याला मंजुरी व निधी उपलब्ध करण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा चालविला . दरम्यान या प्रकल्पाच्या तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मंजुरी बाबतही शासन -प्रशासनाशी समन्वय राखून सर्व कार्यवाही करीत या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी शासनाकडे लावून धरली. यासाठी गेल्या २४ जानेवारी २०२४ रोजी शासनाला पत्राद्वारे अवगत करीत विनंती करण्यात आली असता लगेच दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबतची शिफारस शासनाकडे करण्यात आली.

अशातच शासनाच्या नगर विकास विभागाने नगरोत्थान महाभियानांतर्गत अमरावती शहराच्या रस्ते विकासाच्या १५० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे अमरावती शहरात नागरी पायाभूत सुविधांच्या विकासात आणखीन भर पडली असून शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. याबद्दल आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *