नांदगाव बस स्थानकात पेटली बस

नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने या घटनेत बस पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेली आहे. बसमधील चालक वाहकासह सर्व प्रवासी हे खाली उतरलेले असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. बस स्थानकात गाडीने पेट घेतल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या बस प्रसंगावधान राखत बाजूला केल्याने व प्रवाशी बाजूला झाल्याने इतर नुकसान टळले. दरम्यान बसला आग लागली तेव्हा आग थोड्या प्रमाणात होती. मात्र आग विझवण्यासाठी योग्य ती साधनसामुग्री वेळेत उपलब्ध न झाल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. बॅटरीच्या शॉर्ट सर्किटने बस पेटली असावी असा अंदाज बसस्थानक आगार प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *