मुंबईकरांच्या प्रश्नांबाबत मुंबई मनपा ने काळजी घ्यायला हवी – वर्षा गायकवाड

काल झालेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी भरलं, मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, पण नालेसफाई झाली नाही. मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याचं आपण सातत्याने सांगत असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. पाणी तुंबलेल्या भागाची त्यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांनी मुंबई मनपावर ताशेरे ओढले. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण अडकलेत, मुंबईकरांच्या प्रश्नांबाबत मुंबई मनपा ने काळजी घ्यायला हवी. असंही वर्ष गायकवाड म्हणाल्या. पहिल्या पावसातच पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली.

मुंबई मनपाची तयारी आधीच व्हायला हवी होती. गोवंडीत दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. अश्या दुर्घटना होऊ नये म्हणून काम करायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. असं देखील मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *