जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक आमसभा व्यक्तीगत नाही तर कॉमन संघटन महत्वाचे

अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी स्थानिक हॉटेल हिंदुस्थान येथे संपन्न झाली. या सभेचे कामकाज सुरु होताच सर्वप्रथम दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यांनतर मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी प्रदान करून ते कायम ठेवण्यात आले. तसेच नवीन कार्यकारणी निवड करण्याचा ठराव , संघामध्ये महिलांना प्रतिनीधीत्व देणे , सरकारी आस्थापनामधील जनसंपर्क अधिकाऱ्यांना संघामध्ये सभासदत्व बहाल करणे, खर्चाचे नियोजन व यातून पत्रकारांशी निगडित उपक्रम राबविणे , संघाची ई- लायब्ररी यंदाच्या सालापासून खासगी शिकवणी वर्गाकडून कार्यान्वित करणे ,असे महत्वपूर्व ठराव पारित करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या संबोधनात संगीतले की,संघटना ही फायद्याची नसते , तर ती कॉमन कार्यक्रमावर काम करणारी असून एकत्रिक येऊन संघटनात्मक बांधनीतून एकमेकांना पाठबळ देणारी असते. पत्रकारांना न्याय देण्यासाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघटनेने आजपर्यंत मोलाची भूमिका बजावली असल्याचे अनिल अग्रवाल यांनी संगीतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *