विभागीय क्रीडा संकुलाचे नूतनीकरण व क्रीडा सेवांच्या विस्तारित बांधकामांच्या २९ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

  • आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आले फळास
  • उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे मानले आभार

अमरावती ०६ मार्च : अमरावती नगरीचे क्रीडा वैभव असलेल्या विभागीय क्रीडा संकुल येथे विविध खेळ व क्रीडा प्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण व स्पर्धा आयोजनांची चांगली सुविधा आहे. या संदर्भात आणखीन चांगले नियोजन केल्यास , चांगले क्रीडा इन्फ्रास्ट्रक्चर वाढविल्यास त्याठिकाणी नावीन्यपूर्ण खेळांची सोय व राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाचे आयोजन होऊ शकत असल्याने अमरावतीच्या आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे आवश्यक क्रीडा सुविधांची निर्मिती व भौतिक संसाधनाच्या उपलब्धतेला घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. याची फलश्रुती म्ह्णून आता विभागीय क्रीडा संकुलाचे नूतनीकरण व क्रीडा सेवांच्या विस्तारित बांधकामांच्या २९ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संचालक तसेच अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती विभागीय क्रीडा संकुलाचे नूतनीकरण व क्रीडा सेवांच्या विस्तारित बांधकामांच्या सुधारित अंदाजपत्रक व आराखड्याला घेऊन विभागीय क्रीडा समितीची बैठक मागील २५ सप्टेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती. त्याबैठकीत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी क्रीडा सुविधा, चांगले नाविन्यपूर्ण क्रीडा साहित्य, भौतिक सुविधा, विद्युतीकरण, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, आदी कामे जलदगतीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. तसेच सदरची प्रस्तावित बांधकामे ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याची सूचना केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती च्या वतीने या संदर्भातील डिटेल इस्टिमेट तयार केले . व अमरावती विभागीय क्रीडा संकुल मधील विद्यमान इनडोअर हॉलचे नूतनीकरण , विद्यमान छतावरील पत्रे काढून टाकणे, आणि गटर आणि फ्लॅशिंगसह नवीन डबल स्किन स्टँडिंग सीम रुफिंग प्रदान करणे, बाष्पीभवन कामांचे नूतनीकरण , ४०० मीटर सिंथेटिक धावनपथ (९ लेन्सचा व ८ गोलाकार लेन्स ),ग्रास फुटबॉल मैदान, अँथलेटिक्स क्रीडा साहित्य फुटबॉल मैदानाची सिंचन व्यवस्था, नेट बॉल सिंथेटिक फ्लोरिंग, बाहेरील टेन्सिल रूफ , बाहेरील रस्ते विद्युतीकरण , ३ लक्ष लिटर वरची टाकी बांधकाम करणे, सिंथेटिक जॉकिंग ट्रॅक, सिंथेटिक स्केटिंग रिंग जीएसटी व इतर खर्च, इत्यादी कामांचे रुपये २९ कोटी ३२ लक्ष ८१ हजार रुपये खर्चाचे अंदाज पत्रक व आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता.

दरम्यान आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार तसेच क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाठपुरावा करून अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथील बांधकामासंदर्भात सुधारित अंदाजपत्रक व आराखडा मंजूर करण्याबाबतची विनंती केली. अशातच राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीमध्ये याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

सदर क्रीडा संकुलात वाढीव शासन अनुदान रुपये ३० कोटी मर्यादा विचारात घेऊन रुपये २९ कोटी ३२ लक्ष ८१ हजार इतक्या खर्चाच्या अंदाज पत्रक व आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासन निर्णय निगर्मित करण्यात आला आहे. अमरावतीच्या क्रीडा विकासाला अधिक बळकटी देणाऱ्या या निर्णयाबद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संचालक, अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *