भातकुली तालुक्यात पोळा हा सण उत्साहात साजरा

शेतकऱ्यांचा शेतीमित्र म्हणून बैलाला विशेष महत्व आहे.सद्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा या मित्राच्या प्रती ग्रामीण भागात विशेष आस्था असल्याने त्याचे आदरपूर्वक पालन पोषण केले जाते. इतकेच नव्हे अगदी आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतली जाते. दररोज शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करन्यासाठी श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला पोळा हा सण साजरा केला जातो.आज पोळा असल्याने अळनगांव ,गोपगव्हाण तसेच संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळी बैलाची छान अंघोळ घालून त्याची छान रंगरंगोटी केली जाते. गावातील हनुमान मंदिर,गावठाण या ठिकाणी गावातील सर्व बैल एकत्र जमा होतात त्यांनंतर गावातील पोलिस पाटील सरपंच,यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन व हार अर्पण करून औक्षण केले गेले व शेतकरी बांधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो नंतर बैलपोळा सुटतो नंतर घरोघरी बैलाची सुवासिनी महिलांच्या हस्ते औक्षण करून त्यांना पूर्ण पोळीच्या नैवद्य देण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *