मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा बीएमसी कार्यालयात दाखल

मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज बीएमसी कार्यालय़ात दाखल होत पाहणी केली. आधीपेक्षा यंदा नालेसफाई खुप चांगल्यारितीने प्रभावीपणे झाली होती. याठिकाणी मोठे पाण्याचे रिझर्व टॅंक देखील बनवलेले आहेत. तसेच त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. सध्या पावसाची सुरवात असल्यामुळे विशिष्ट्य टीम ची अजून गरज नाही पण त्या ठिकाणी काही गरज लागल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अश्या टीम बनवणार. आपत्ती ठिकाणी कंट्रोल रूम मधून सर्वाधिक मदत ही केली जाते. त्यात मुंबई मधील सर्व ठिकाणी नगर ठेवली जातं आहे, महानगर पालिकेचे कर्मचारी 300 लाईफ गार्ड तैन्यात करण्यात आले असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली. पावसाचा जोर वाढलयास आपत्तीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गरज लागल्यास बाहेर यावे आणि काही घडल्यास फोन करावा असं आव्हाहनदेखील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *