पहिल्या फेरीतील अकरावी प्रवेशासाठी २६ जून पर्यंत मुदतवाढ अद्यापपर्यंत ४,०११प्रवेश , अजूनही १२,१६९ जागा रिक्त

अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ५,१५५ विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी नुकतिक ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. . यंदा अकरावीची प्रवेश क्षमता १६,१८० असून पहिल्या गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आला आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रातील ६५ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया प्रवेश समिती मार्फत राबविण्यात येत आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत कला शाखेच्या ७१४ जागांपैकी ५४५ , वाणिज्य ७०० मधून ५४४ , विज्ञान ३७१२ मधून २८९८ , तर एचएमसीव्हीसी व्होकेशनलच्या २९ मधून २४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. अजूनही पहिल्या यादीतील प्रवेश होणे बाकी असल्याने २६ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाचे ४०११ प्रवेश निश्चित झाले असून अजूनही १२,१६९ जागा रिक्त आहे. पहिल्या फेरी नंतर दुसरी यादी जाहीर होणार आहे. तेव्हा पहिल्या फेरीतील प्रवेश लवकरात लवकर निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा ,असे आवाहन अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीचे समन्वयक अरविंद मंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *