शौचालयात ठेवलेला भाजीपाला भाजी मंडईत विक्रीला, व्हिडीओ आला समोर

बीड शहरातील भाजी मंडईत असणाऱ्या महिला शौचालयात, भाजीमंडईत विक्री केला जात असणारा भाजीपाला ठेवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. शौचालयाच्या बाजूला भाजीपाला व्यापारी आपली दुकान थाटून बसतात. दिवसभर भाजीपाला विकतात… आणि रात्री उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या नगरपालिकेच्या महिला शौचालयामध्ये ठेवला जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येतो.

  • विशेष म्हणजे नगरपालिकेने हे शौचालय महिलांसाठी बांधलंय. मात्र या शौचालयाचा रात्रीच्या वेळी हा भाजीपाला विक्रेता जणूकाही कोल्ड स्टोरेज म्हणून या शौचालयाचा वापर करतोय की काय ? असं वाटू लागलंय.
    विशेष म्हणजे स्वच्छ बीड सुंदर बीड असा नारा बीड नगरपालिका देत आहे. मात्र याच नगरपालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालयात भाजीपाला विक्रेता आपला भाजीपाला ठेवतोय. आणि तोच भाजीपाला बीडकरांना विकून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आलाय..
    दरम्यान या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली असून बीडकरांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता नगरपालिका यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *