गोंदिया । टीईटीच्या परीक्षेत ब्लुटुथचा वापर! शहरातील एका केंद्रावरील प्रकार

गोंदिया, स्थानिक कुडवा नाका स्थित संत तुकाराम हायस्कूलमध्ये झालेल्या टीईटी परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने चक्क ब्लूटूथ कानाला लावून टीईटीचा पेपर सोडविल्याचे समोर आले आहे. हा प्रकार खुद्द केंद्रावरील परीक्षार्थ्यांनी उजेडात आणला. आता त्या हायटेक कॉपी करणार्‍या विद्यार्थिनीवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.

टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आज, रविवारी राज्यभरात घेण्यात आली. गोंदियातही या परीक्षेला बहुसंख्य विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मात्र, शहरातील संत तुकाराम हायस्कूलच्या केंद्रात घडलेल्या या प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या केंद्रातील खोली क्रमांक पाचमध्ये एका विद्यार्थिनीने ब्लू – टूथ कानाला लावला होता. सकाळी 10.30 ते दुपारी एकपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. पेपरची वेळ पूर्ण होईपर्यंत हा प्रकार लक्षात आला नाही. परिक्षा संपल्यानंतर सदर परीक्षार्थीच्या पतीने ब्लू टूथ कुठे आहे असा प्रश्न केला असता तिने आपल्या जवळच असल्याचे सांगताच जवळच असलेल्या परीक्षार्थीमध्ये गोंधळ उडाला. सदर विद्यार्थिनीच्या गळ्यात ब्लू – टूथ असल्याचे निदर्शनास आले. मात्र मोबाईल परिक्षा केंद्राबाहेर होते. हा प्रकार समोर येताच अनेक परीक्षार्थ्यांनी आक्षेप नोंदवत प्रकाराची तक्रार संबंधित केंद्र प्रमुख्याांकडे केली. त्यानंतर ब्लू – टूथ जप्त करीत संबंधित विद्यार्थिनीचे म्हणने ऐकून घेत तक्रार लिहून घेण्यात आली. तर त्या विद्यार्थिनीने ब्लू टूथ जवळ बाळगला, मात्र वापर केला नसल्याचे सांगितल्याचे. दरम्यान याप्रकरणाचा व्हीडीओ शहरात प्रसारीत झालेला आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे यांच्या भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *