नागपूर व गोंदीया वनविभागाच्या कारवाईत बिबट्याच्या कातडीसह १० आरोपी अटकेत

नागपूर व गोंदीया वनविभागाच्या संयुक्त कारवाईत बिबट्याच्या कातडीसह दहा आरोपींना अटक करण्यात आली. सालेकसा परिसरात झालेल्या या कारवाईत बिबट्याची कातडी, दात, पंज्यासह १० आरोपींना अटक केली. या कारवाईने खळबळ माजली आहे. कासेमतराच्या जंगलात जुलै २०२१ मध्ये या बिबट्याची शिकार करण्यात आली होती. चार महिन्यानंतर त्याचे अवयव आरोपींनी विक्रीसाठी बाहेर काढले होते.

नागपूर विभागात गेल्या काही दिवसांत वाघ तसेच इतर वन्यजीवांच्या कातडी तस्करीप्रकरणी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून अनेक ठिकाणच्या गुन्ह्यांची माहिती समोर येत आहे. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपूर व गोंदीया वनविभागाच्या संयुक्त पथकाने (Forest department) सालेकसा कनिष्ठ विद्यालयाच्या मैदानावर धाड टाकण्यात आली. यात राधेश्याम जोहार उईके, जोगेश्वर सुपितदास दसरीया, पप्पू जोहारलाल मडावी, दिनेश प्रभूदयाल श्रीवास्तव, संदीप चोखा रामटेके, दिनेश ताराचंद सहारे, विनोद सुखदेव दशरीया, लितेश कृष्णकुमार कुंभरे, परसराम राया मेश्राम, रामकृष्ण छोटेलाल डहाले यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *