अमरावती । जत्रेत गॅसचा फुगा घेताना सिलेंडरचा स्फोट, स्फोट इतका भयंकर कि चिमुकलीचा पाय धडावेगळा झाला नंतर चिमुकलीने प्राण सोडले

अमरावती : जत्रेत गॅसचा फुगा घेताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुगे घेण्यासाठी आलेल्या चिमुकलीचा पाय या स्फोटात धडावेगळा झाल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला होता. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. चिमुरडीचे आजोबाही स्फोटात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावती जिल्ह्यात हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. गॅसमध्ये अतिरिक्त रसायन टाकल्यामुळे हा स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

तानपुरा निमित्त अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी लहान मोठ्या जत्रांचे आयोजन करण्यात येते. शनिवारी जिल्ह्यातील अचलपूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सिंधी बुजरूक गावात जत्रा आयोजित करण्यात आली होती.

जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्या इसमाने गॅसमध्ये अतिरिक्त प्रमाणात रसायन टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता, की यामध्ये फुगे घेण्यासाठी आलेली चिमुकल्या परी रोही हिचा पाय क्षणात धडावेगळा झाला.

प्रचंड दाब असलेले हे सिलेंडर हवेत उडाले. त्यानंतर स्लॅबवर आदळल्याने स्लॅबचा भाग फुटून खाली पडला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे यावेळी गावात एकच खळबळ उडाली.

आजोबांच्या कडेवर असलेली परी आणि तिचे आजोबा दोघेही जण या अपघातात गंभीर जखमी झाले. परतवाडा शहरातील एका खाजगी रुग्णालय परी व तिच्या आजोबांवर उपचार सुरु होते. मात्र या स्फोटानंतर परीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *