लम्पीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात सरकार अपयशी, माजी खासदार राजु शेटी यांचा आरोप: सरकार कुणाचे हाच संभ्रम

वाशिम : राज्यात लम्पीच्या आजाराने थैमान घातले आहे. गुजरात,राजस्थान आणि छत्तीसगड नंतर राज्यात लम्पीच्या आजाराने बाधीत होणाऱ्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुर्दैवाने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेत माजी खासदार राजु शेटटी यांनी केला.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनेचे दामु अण्णा इंगोले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, भविष्यात कोणत्याच पक्षाशी युती न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्रपणे लढत राहु. रिसोड विधानसभा मतदार संघात स्वाभीमानी शेतकरी संघटना निवडणुक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. आक्रोश मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना माजी खासदार राजु शेटटी यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी घरी बसून पीक नुकसानीचे सर्वे केले त्यामूळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागत असल्याबाबत सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *