वाशिम जिल्हा परिषद गुड मॉर्निंग पथकाची लोटे बहादरावर कारवाई

वाशिम जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागामध्ये कोणीही उघड्यावर शौचालयाला जाऊ नये याकरता वाशिम जिल्ह्यामध्ये गुड मॉर्निंग पथकाची टीम तयार करण्यात आली आज गुड मॉर्निंग पथकाने वांगी धानोरा एक बुर्जी आडोळी इत्यादी गावांमध्ये सकाळी पाच वाजता जाऊन बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना समज दिली आणि आपले गाव लोटा मुक्त करा स्वच्छ सुंदर बनवा गावातील कोणी नागरिक उघड्यावर शौचालयाला बसणार नाही याची दक्षता घ्या असा सल्ला बाहेर जाणाऱ्या लोटा बहादराना दिला यावेळी गुड मॉर्निंग पथकातील प्रफुल काळे शंकर आंबेकर सुमेर चांनेकर प्रदीप सावळकर व त्यांच्या टीम मधले सर्व जन तथा त्या त्या गावचे सरपंच उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *