धक्कादायक ! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं

मुंबई : सध्या सगळीकडेच गोवरच्या आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे. परंतु सध्या या प्रकारानं राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार मुंब्रामध्ये घडला आहे. ठाण्यातील मुंब्रा येथे कुलूप बंद घरात गोवर बाधित 4 बालकांना बंद करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालकांवर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्वरित उपचार सुरू केले आहेत.

गोवरच्या आजाराने डोके वर काढले असून बालकांना लसीकरण करून घेण्यास काही भागात विरोध केला जात असताना कौसा येथील पालिकेच्या आरोग्य केंद्राच्या हद्दीत एका घरात बालकांना लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरातील पालकांनी घरातच तब्बल 4 बालकांना ठेवून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. ही बाब पालिकेच्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोवर बाधित मुलांवर त्वरित उपचार केले. दरम्यान गोवर आजार संदर्भात लोकांची मानसिकता अजून बदललेली नसल्याचे या निमित्ताने उघड झाले असून पालिका प्रशासनाने शोधमोहीम आणखीन कठोर सुरु करून लसीकरण वाढवण्यासाठी पाऊले उचलले आहेत. ठाणे पालिका हद्दीत आतापर्यंत 51 रुग्ण उपचार घेत असून पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे 36 तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 14 रुग उपचार घेत आहेतण् गेल्या 10 दिवसात 341 रुग्ण संसर्ग बाधित आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *