प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्टान द्वारा सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन

  • स्वर-शोध खुली सिने गीत स्पर्धेची निवड फेरी १४ जानेवारीला
  • सामूहिक नृत्य स्पर्धेसाठी १५ जानेवारीला ऑडिशन

अमरावती १ १ जानेवारी : विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून अमरावतीचा नावलौकिक आहे. कला, क्रीडा , मनोरंजन,साहित्य आदी क्षेत्रात अमरावतीचा लौकिक असून विविध उत्सव ,महोत्सव व स्पर्धा तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून अमरावतीकरांनी नेहमीच जल्लोष व आनंदाची मेजवानी अनुभवली आहे. त्यात दरवर्षीं साजरा होणारा प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान चा भव्य-दिव्य व अभूतपूर्व असा सांस्कृतिक महोत्सव अमरावती शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ व कलेचे नवे दालन खुले करणारा ठरला आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे सांस्कृतिक महोत्सव होऊ शकला नाही . यंदा मात्र नवीन वर्षात याची प्रतीक्षा संपली असून शहरवासीयांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सांस्कृतीक महोत्सव २०२३ चे आयोजन दिनांक २७,२८ व २९ जानेवारी २०२३ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध कलाविष्कार व रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना देण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यस्तरीय हिंदी -मराठी खुली सिने गीत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी गट अ मध्ये प्रथम पारितोषिक १५ हजार, द्वितीय पारितोषिक १० हजार, तृतीय पारितोषिक ५ हजार ,तर १ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. तर गट ब मध्ये प्रथम पारितोषिक ३१ हजार ,द्वितीय पारितोषिक २१ हजार ,तृतीय पारितोषिक ११ हजार तर उत्तेजनार्थ ३ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्वर -शोध सिने गीत गायन स्पर्धेत सहभागी होण्याकरिता येत्या शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी निवड फेरी (ऑडिशन ) घेण्यात येणार आहे. आरसीएन डिजिटल कार्यालय तिसरा माळा राजापेठ मनपा व्यापारी संकुल अमरावती येथे ही निवड फेरी होणार आहे. तर सांस्कृतिक महोत्सव मध्ये राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेचे सुद्धा विशेष आकर्षण असणार आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक ५१ हजार , द्वितीय पारितोषिक ३१ हजार , तर तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे . राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेची निवड फेरी (ऑडिशन) रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह शिवाजी नगर अमरावती येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कलावंतांनी सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहिती व संपर्क साधण्याला घेऊन आरसीएन डिजिटल कार्यालय तिसरा माळा राजापेठ अमरावती येथे संपर्क साधावा . स्वरशोध सिने गीत स्पर्धा व सामूहिक नृत्य स्पर्धाचे भव्य असे राज्यस्तरीय आयोजन असल्याने राज्यभरातून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर गावातील कलावंतांना निवड फेरी मध्ये गुगल फार्म भरून सहभागी होता येईल , करिता समुह नृत्यस्पर्धेसाठी https://bit.ly/shodhdanceaudition व स्वर शोध गीत गायन स्पर्धेसाठी bit.ly/swarshodh या लिंक वर आपले ऑडिशन चे व्हिडीओ अपलोड करण्याचे आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान च्या अध्यक्ष तथा आ. सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *