कृपा पाटीलने पटकाविले महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल, सर्वात कमी वयाच्या पावर लिफ्टर स्पर्धेत ठरली अव्वल

अमरावती, शहरातील कृपा गणेश पाटील हिने रायघर येथे पार पडलेल्या वेट लिफ्टींग स्पर्धेत 97.5 किलो वजन उचलून महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल पटकाविले आहे. सर्वात कमी वयाच्या पावर लिफ्टर स्पर्धेत कृपा पाटील ही अव्वल ठरली असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंटरनॅशनलच्या तयारीत कृपा
कृपा गणेश पाटील ही जुना सातुर्णा परिसरातील श्रद्धा श्री अपार्टमेंटमध्ये राहत असून, ती विजया स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिला स्पर्धेसाठी शाळेकडून सुध्दा सहकार्य मिळालेला आहे. तीने 10 वर्षावरील वयोगटात नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला होता. छत्तीसगड येथील रायगड येथे नुकत्याच पार पडलेल्या पावर लिफ्टर स्पर्धेत कृपा पाटीलने गोल्ड मेडल मिळविले आहे. तिचे वय इतर खेळाडुच्या तुलनेत सर्वात कमी होते. अशा स्थिती तीने 97.5 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडून खेळत असलेली कृपा गणेश पाटील आता प्रशिक्षक स्वराज व मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनॅशनल खेळण्यासाठी तयारी करत आहे.

विजयी होऊन अमरावतीत येताच स्वागत
कृपा हिने आखाडा नावाचा जिमचे स्वराज, सपोर्टर मानकर, श्रेयस माटे यांच्या मार्गदर्शनात हा बहुमान पटकाविला आहे. नॅशनल पावर लिफ्टिंगसाठी इंटरनॅशनल कोच दगडू गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली ती खेळायला गेली होती. 5 ते 8 जानेवारीदरम्यान या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ छत्तीसगड येथील रायघर येथे झाला. त्यावेळी कृपा पाटील हिला महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. 9 जानेवारी रोजी कृपा पाटील यशस्वी होऊन घरी परतल्यानंतर तिचे नागरिकांनी भव्य असे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *