महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, नाट्य क्षेत्रातही ह. व्या. प्र. मंडळाचा दबदबा

दि. ३ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह, अमरावती येथे 19 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण ३८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती मधुमती पवार, पियुष नाशिककर आणि सुधीर देशपांडे यांनी काम पाहिले. प्राथमिक फेरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक नाटकं अमरावती केंद्रावर नोंदवल्या गेलेत आणि या विविध नाटकात मिळून जवळपास पाचशे कलावंतांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत अमरावती केंद्रातून श्री रामकृष्ण क्रिडा विद्यालय, अमरावती या संस्थेच्या ‘इथे भुते राहतात’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच अविष्कार सामाजिक, क्रिडा, शिक्षण बहुउद्देशिय संस्था, वाशिम या संस्थेच्या इस्कोट या नाटकास द्ितीय आणि अभंग बहुद्देशिय संस्था, अमरावती या संस्थेच्या माकड चाळे या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. या तिन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शन मध्ये प्रथम प्रणव कोरे (नाटक: इथे भुते राहतात), द्ितीय अश्विन जगताप (नाटक : इस्कोट), तृतीय अभिजित झाडे (नाटकःमाकड चाळे) तर प्रकाश योजने मधे प्रथम दीपक नांदगावकर (नाटक- इथे भुते राहतात), द्ितीव प्रणव कोरे (नाटक- इस्कोट) तर नेपथ्य मधे प्रथम शुभम स्थुल (नाटक- झेप), द्वितिय वर्षा जेन (नाटक: माकड चाळे), तर रंगभूषा मधे प्रथम पारितोषिक अभिजित देशमुख (नाटक-कुपीतलं गुपीत), द्वितीय प्रथमेश हाते- झेप) उत्कृष्ट अभिनय रोष्यपदक स्नेहांशु ठाकरे (नाटक माकड चाळे) व॒ रश्मी धोपे (नाटक- इस्कोट) यांना पारितोषीक प्राप्त झाले आहेत. सर्व सहभागी चमू आणि विजेत्यांचे स्पर्धा समन्वयक ऍड. चंद्रशेखर डोरले आणि सहसमन्व्यक विशाल फाटे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *