नेहरू युवा केंद्र व इंडिपेंडंट अकॅडमी द्वारे आयोजित फुटबॉल स्पर्धेत चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन

नेहरू युवा केंद्र व इंडिपेंडंट अकॅडमी द्वारे आयोजित फुटबॉल स्पर्धेत क्रीडापटू स्पर्धक यांच्या वतीने चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन केल्या जात आहे. केवळ जिंकण्याचे लक्ष डोळ्यासमोर समोर ठेवून जिद्द व चिकाटीचा परिचय देऊन प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी सहभागी संघांनी यावेळी एकच बाजी लावल्याचा थरार यावेळी रंगला होता.

नेहरू युवा केंद्र ( युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार) व इंडिपेंडंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २२ जानेवारी २०२३ पर्यंत सायन्सकोर मैदानावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.१६ ते २१ वर्षे वयोगटातील अमरावती जिल्ह्यातील फुटबॉल संघांनी या सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत इंडिपेंडंट अकॅडमी, स्पोर्ट्स क्लब,रॉकी क्लब,एयूएफसी क्लब,एएफसी क्लब,पीएफए क्लब,सिद्धार्थ क्लब,नरसिमहा फुटबॉल क्लब या संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत साखळी पद्धतीने व बाद पध्दतीने सामने घेण्यात आले. इंडिपेंडंट अकॅडमी चे अध्यक्ष-प्रमोद उर्फ बाळासाहेब सोलीव ,सचिव -दिनेश म्हाला,नेहरू युवा केंद्र जिल्हा समनवयक-स्नेहल बासुतकर, अशोक महल्ले ,सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी-हरिहरनाथ मिश्रा,यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हे सामने घेण्यात आले. या सामन्यांकरिता अभिनव म्हाला,शुभम चवरे,प्रतीक बुंदेले,कार्तिक म्हाला यांनी पंच म्हणून जवाबदारी सांभाळली. या सामन्यादरम्यान क्रीडापटूंनी आपल्या अंगीभूत क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करीत उपस्थित क्रीडारसिकांच्या टाळ्या मिळविल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *