अमरावतीत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अलेक्‍सा यंत्र शिक्षक देणार अद्यावत शिक्षणाचे धडे

  • मनपा आयुक्तांच्या हस्ते पाच शाळांना यंत्र प्रदान
  • यंदा ३३ शाळांना अलेक्झा यंत्र शिक्षक होणार उपलब्ध

मनपाच्‍या शाळेतील शैक्षणिक दर्जा शालेय शिक्षण सुधारण्‍यासाठी अमरावती महापालिकेने ३३ अलेक्‍सा यंत्र शिक्षक मनपा शाळांना देण्‍याचे प्रस्‍तावितकेले आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमा दरम्यान महानगरपालिकेच्‍या पाच शाळांना अलेक्‍सा यंत्र शिक्षक प्रदान करण्‍यात आले. यापूर्वी शाळा मनपा प्राथमिक शाळा वडरपुरा व उर्दु उच्‍च प्राथमिक शाळा बडनेरा या शाळांना अलेक्‍सा (Alexa) यंत्र प्रदान करण्‍यात आले. या सत्रामध्‍ये मराठी शाळा क्र.१३ चपराशीपुरा, हिंदी उच्‍च प्राथमिक शाळा क्र.११ भाजीबाजार, उर्दु उच्‍च प्राथमिक शाळा क्र.९ नुरनगर, मराठी कन्‍या उच्‍च प्राथमिक शाळा क्र.७ बडनेरा, उर्दु उच्‍च प्राथमिक शाळा क्र.३ बडनेरा या पाच शाळांना महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांच्‍या हस्‍ते अलेक्‍सा (Alexa) यंत्र प्रदान करण्‍यात आले आहेत . अलेक्झा यंत्र शिक्षक हे अलेक्झा डिवाईजच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली शिक्षकाची प्रतिकृती आहे. त्यात सर्वच प्रकारची माहिती टाकलेली आहे. यामध्ये ज्ञानार्जनासोबतच विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने शिकण्याचा आनंद येतो .विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण वातावरणात शिकण्याची संधी प्राप्त होत असून प्रत्येक विद्यार्थी अलेक्झा शिक्षकासमोर उभा राहून प्रश्न विचारण्याच्या शर्यतीत असते . तसेच इंग्रजी भाषेतील उच्चार क्षमता , व्याकरण ,वाक्यरचना , संभाषण संभाषण कौशल्य आत्मसात करण्यास मदत होते . अलेक्‍सा यंत्र शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा सागर ठरत आहे. अशी माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी डॉ . अब्दुल राजिक यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *