अमरावतीच्या सुपर‎ स्पेशालिटी मधे विदर्भात‎ सर्वाधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया व‎ उपचार

अमरावती शहर, जिल्ह्यासह‎ परिसरातील जिल्ह्यांतील दुर्धर‎ आजारांच्या रुग्णांवर तसेच इतरही‎ आजारांवर शहरातील सुपर‎ स्पेशालिटी रुग्णालयात उपचार केले‎ जातात. दरम्यान, मागील वर्षभरात‎ या ठिकाणी तब्बल साडेपाच हजार‎ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.‎ यासोबतच रुग्णांना शासकिय‎ योजनेचा लाभ मिळवून देत उपचार‎ दिल्यामुळे सर्वच घटकातील रुग्णांना‎ फायदा झाला आहे. दरम्यान‎ शासनाच्या ज्योतिराव फुले जन‎ आरोग्य योजनेअंतर्गत सुपर‎ स्पेशालिटी रुग्णालयाने केलेले कार्य‎ लक्षात घेता राज्यातून दुसरा तर‎ विदर्भातून पहिला क्रमांक मिळाला‎ आहे. त्यासाठी नुकताच प्रभारी‎ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘सुपर’च्या‎ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात‎ आले. शासकीय रुग्णालयास हित‎ अनेक खासगी रुग्णालय देखील या‎ योजनेत समाविष्ट आहेत. राज्यात‎ ४९२ रुग्णालयात ही योजना सुरू‎ आहे. या माध्यमातून रुग्णाचे उपचार‎ व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात.‎ मागील वर्षात शहरातील विभागीय‎ संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर‎ स्पेशालिटी) एकूण साडेपाच‎ हजारांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत.‎ या योजनेअंतर्गत रूग्नांना मोफत‎ सेवा पुरवण्यात येते.

यात विविध‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार‎ करण्यात येतात. यामध्ये विदर्भात‎ सर्वाधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया व‎ उपचार मोबदल्यात क्षतीपुरतीचा‎ लाभ अमरावतीच्या विभागीय संदर्भ‎ सेवा रुग्णालयाला (सुपर‎ स्पेशालिटी) मिळाला. म्हणूनच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शासनाच्या वतीने त्यांना या उत्कृष्ट‎ कामाकरिता २६ जानेवारीला गौरवले‎ आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा‎ मुख्य कार्यपालन अधिकारी‎ अविष्यांत पंडा यांनी रुग्णालयाच्या‎ वैद्यकीय समन्वयक डॉ. पायल‎ रोकडे व डॉ. दिवयानी मुंडाणे यांना‎ प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.‎ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम‎ सिद्ध भट्टी प्रामुख्याने उपस्थित होते.‎ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मागील‎ वर्षभरात विवीध आजारांच्या एकूण‎ साडेपाच हजार शस्त्रक्रिया झाल्या‎ असून, त्यामध्ये लहान स्वरूपाच्या ४‎ हजार, मोठ्या स्वरूपाच्या १ हजार‎ आणि अतिशय क्लिष्ट स्वरूपाच्या‎ पाचशे शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.‎

सुपर मध्ये प्रामुख्याने लहान‎ बालकांवर विशेष जन्मत: असलेल्या‎ आजारांवर शस्त्रक्रिया केली जाते.‎ तसेच मुतखड्यावरील लेझर व‎ शस्त्रक्रियेद्वारे उपचार, किडनी‎ संबंधी आजारांवर उपचार व‎ शस्त्रक्रिया, हृदयाशी संबधी उपचार‎ तसेच प्लॅस्टिक सर्जरी केली जाते.‎ या सर्व शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या‎ रुग्णांना शासकिय योजनेचा लाभ‎ देणे, त्यासाठी रुग्णांना काही‎ अडचण आल्यास आवश्यक ती‎ सर्व मदत करण्यात येत आहे.‎ रुग्णालयाने केलेल्या या‎ कामगिरीसाठी वैद्यकीय अधीक्षक‎ डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य‎ अधिकारी डॉ. नीलेश पाचबुद्धा,‎ दिगंबर इंगोले, बिपिन भगत, कुंदन‎ मातकर, मंजूषा गहूकर, मेघा पांडे,‎ ललित तायडे, चेतन मुळे, अक्षय‎ कावळे, भूपेंद्र जेवडे, प्रीतम चक्रे या‎ कर्मचाऱ्यांचे तसेच रुग्णालयातील‎ सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी‎ यांचे सहकार्य लाभले‎.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *