मोबाईल संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी…वन अवर मोबाईल नेव्हर चा उपक्रम माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांची अभिनव संकल्पना

आज विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल ने आपले जीवन गतिमान जरी केले असले तरी मोबाईलच्या अतिरिक्त व अवास्तव वापरामुळे आपण आपले शारीरिक क्षमता कमी करत आहोत, हे असेच चित्र राहिल्यास आपले स्वतःवर दुर्लक्ष होऊन मोबाईलच्या विळख्यात आपले आयुष्यच हरवून जाईल , यापासून आजच्या पिढीला परावृत्त करून किमान एक तास तरी आपल्या स्वतःसाठी द्यावा , या साठी ONE HOUR MOBILE NEVER म्हणजेच एक तास मोबाईल व्यतिरिक्त ही अभिनव संकल्पना विद्यार्थी , पालक व नागरिकांमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती संकल्पना संयोजक तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली . या साठी एक प्रतिज्ञा सुद्धा बनविण्यात आली असून १ फेब्रुवारी पासून याचे सर्व ठिकाणी वाचन करण्यात येणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. तसेच श्रम साफल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती व श्री क्रिकेट ॲकॅडमी च्या वतीने १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत आयोजित भव्य रात्र कालीन कास्को टेनिस बॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे . स्पर्धेचे उदघाटन तसेच श्रम साफल्य अभियंता कॉलनीतील क्रीडांगणाच्या चैनलिंग फेन्सिंग व सौदर्यीकरणाचे लोकार्पण येत्या १ फेब्रुवारी २०२३ रोजी आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर तर ५ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला असल्याचे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले . या पत्रकार परिषदेला पोदार इंटरनेशनल स्कूल कठोरा शाखा चे प्राचार्य-सुधीर महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई ठाकरे,श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण विकास समितीचे अध्यक्ष सुमित इंगोले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत,सरचिटणीस-सचिन दळवी,सचिन उर्फ छोटू खंडारे, इंजिनिअर-पंकज कांडलकर,उमेश जगताप,पंकज हरणे, गजानन दळवी,सर्वज्ञ बारबदे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *