राज्यस्तरीय आमदार चषक स्पर्धेत सहभागी महिला कब्बडीपटुंनी दणाणून सोडले मैदान..

  • उमेद नवी विजयासाठी जिद्द हवी या उदात्त्य भावनेने उतरल्या रिंगणात
  • थरारक कबड्डी सामन्यातून खेळ भावनेचे अभूतपूर्व दर्शन

अमरावती 19 फेब्रुवारी: प्रो -कबड्डीच्या धर्तीवर अमरावती शहरामध्ये प्रथमच आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पधेचा थरार चांगलाच रंगात आला आहे. आ. सौं. सुलभाताई खोडके यांच्यामार्गदर्शनात व शोध प्रतिष्ठान चे अध्यक्ष यश खोडके यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन अमरावती च्या वतीने संत गाडगे महाराज मंदिर प्रांगण येथे सदरचे भव्य आयोजन हे विदर्भातच नव्हे तर राज्यभरातील क्रीडा वर्तुळात चर्चा व आकर्षणाचा विषय ठरले आहे. स्पर्धेत शनिवारी सायंकाळच्या सत्रामध्ये ७० वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आमदार चषक मध्ये ( पुरुष व महिला गट ) सहभागी झालेल्या संघांनी नेत्रदीपक कामगिरी बजावीत उपस्थित क्रीडारसिकांना दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. आपली माती आपला खेळ या शब्दपंक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधून आपल्या क्रीडाकौशल्याचे कसब पणाला लावून खेळ भावना जोपासीत यावेळी खेळाडूंनी क्षणोक्षणी चित्तवेधक खेळीतून प्रतिस्पर्धी संघाला झुंज देऊन आपल्या संघाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी निकराने लढा देत असल्याचे चित्र या स्पर्धेदरम्यान दिसून आले.

राज्यस्तरीय आमदार चषक 2023 गुणतालिका.. 19-02-2023 (सायंकाळचे सत्र-साखळी फेरी)

पहिला सामना (पुरुष गट) वर्धा विरुद्ध गोंदिया, वर्धा 46 गुण, गोंदिया 15 गुण.. 31गुणांनी वर्धा संघ विजयी…

(महिला गट) वर्धा विरुद्ध चंद्रपूर, वर्धा 20 गुण चंद्रपूर 47 गुण,*
चंद्रपूर संघ 27 गुणांनी विजयी…..

दुसरा सामना (पुरुष गट) अकोला विरुद्ध गडचिरोली अकोला 35 गुण, गडचिरोली 11 गुण,
अकोला संघ 24 गुणांनी विजयी..

(महिला गट) अकोला विरुद्ध भंडारा, अकोला 45 गुण भंडारा 26 गुण, अकोला संघ 19 गुणांनी विजयी..

तिसरा सामना (पुरुष गट ) वाशीम विरुद्ध यवतमाळ, वाशीम 45 गुण, यवतमाळ 32 गुण,
वाशीम संघ 13 गुणांनी विजयी..

(महिला गट ) अमरावती विरुद्ध यवतमाळ, अमरावती जिल्हा संघ 42 गुण, यवतमाळ संघ 11 गुण, अमरावती चा संघ 31 गुणांनी विजयी

चवथा सामना (पुरुष गट ) बुलढाणा विरुद्ध भंडारा, बुलढाणा 27 गुण, भंडारा 46 गुण, भंडारा जिल्हा संघ 19 गुणांनी विजयी..

( महिला गट ) भंडारा विरुद्ध चंद्रपूर, भंडारा 40 गुण, चंद्रपूर 38 गुण, भंडारा संघ 2 गुणांनी विजयी.

पाचवा सामना (पुरुष गट) नागपूर विरुद्ध गडचिरोली, नागपूर 43 गुण, गडचिरोली 20 गुण,
नागपूर जिल्हा संघ 23 गुणांनी विजयी

(महिला गट ) अकोला विरुद्ध वर्धा – अकोला 47 गुण वर्धा 34 गुण, अकोला संघ 13 गुणांनी विजयी

सहावा सामना (पुरुष गट ) अकोला विरुद्ध चंद्रपूर – अकोला 21 गुण चंद्रपूर 43 गुण, चंद्रपूर जिल्हा कबड्डी चा संघ 22 गुणांनी विजयी ठरला.

सातवा सामना (पुरुष गट) यवतमाळ विरुद्ध वर्धा, यवतमाळ 43 गुण वर्धा 39 गुण, यवतमाळ संघ 4 गुणांनी विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *