३० फूट खोल दरीत जीप कोसळली; दाेन पाेलिस गंभीर जखमी

लातूर : लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील तिरुका या गावाजवळ उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या जीपचा वळणावर अपघात झाला. या अपघातात पोलिस जीप ३० फूट खोल असलेल्या दरीत जाऊन कोसळली आहे. या घटनेची माहिती जळकोट पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

नांदेड येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत एका मयताचा व्हिसेरा तपासणीसाठी जमा करण्यास पाेलिस जीपने नांदेडला होते. नांदेड येथून परतत असताना मध्यरात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास वळणावर पाेलिसांच्या जीपला अपघात झाला.

या अपघातात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मच्छिंद्र वरती आणि गोपाळ भालेराव असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दाेन्ही पाेलिस कर्मचा-यांना उदगीरच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *