निर्दयीपणाचा कळस! एकाच वाहनात कोंबून भरली होती १९ जनावरं, ५ गुरांचा मृत्यू, पोलिसांच्या सतर्कतेने १४ गुरांचे वाचले प्राण

प्रतिनिधी, विजय काकडे

परतवाडा ते बहिरम मार्गावर पेट्रोलिंग करतांना जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्याआधारे वाहनांची तपासणी करत असताना एकाच वाहनात एकोणीस जनावर दिसून आली मात्र यामधील पाच लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले पण पोलिसांच्या सतर्कतेने चौदा गुरांचे प्राण वाचले आहे याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

परतवाडा ते बहिराम मार्गावर पेट्रोलिंग करत असतांना ट्रक क्र यु पी ८३ सिटी ४८७६ मोठ्या शिफारशीने तपासणी केली असता ट्रक मध्ये जनावर कोंबून नेत असल्याचे आढळून आले यावेळी ट्रक मध्ये १३ गायी, ६ वासरे असे एकूण १९ जनावर आढळून आले सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये पाच जनावर मृत होते हे लक्षात येताच पोलिसांनी सखोल विचारपूस केली यावेळी ही वाहतूक कत्तल करण्याच्या उद्देशाने होत असल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांनी अलाउदिदन उर्फ कालु सलामुददीन, (५३) रा. पडाव रूकपुर, शिकोहाबाद, फिरोजाबाद उत्तर प्रदेश, मनोज कुमार उम्मेद सिंह,( ३७) वर्ष (क) सजाबाहारपुर, हाजीपुर नुरा उत्तर प्रदेश, अजय कुमार श्रीकृष्ण बहसी, मैनुपरी, उत्तर प्रदेश या तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण ३ लाख,९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर १४ जनावरांना जीवनदान देण्यात आले आहे सदर जनावरे चारापाण्याचे व्यवस्थेकरिता रासेगाव गौरक्षणात ठेवण्यात आली आहे तसेच मरण पावलेल्या जनावरांची न्यायालयाचे आदेशाने योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक,शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले, पो.उप. नी. मनोज कदम, पोलिस शिपाई विनोद राउत, गणेश बेलोकार, कमलेश मुराई,सचिन होले, जयसिंग चव्हाण, विवेक ठाकरे, शुभम मार्कंड, वैभव ठाकरे सह परतवाडा डि बी पथक परतवाडा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *