अमरावती जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे एका शेतकरी मजूर महिलेचा मृत्यू

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात पुरात वाहून गेली मजूर महिला; सकाळी मृतदेह सापडला

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शहापूर – दाभाडा या भागात काल सायंकाळी अचानक आलेला पाऊस ढगफुटीसारखा कोसळला. यामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे ३४ वर्षीय महिला वाहून गेली होती. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने काही अंतरावर वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह शोधून काढला,संगीता सुधीर शेलोटे (३४) असे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. शहापूर येथील तीन महिला दाभाडा शिवारातील शेतात कामाला गेल्या होत्या. या भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे दाभाडा – शहापूर मार्गातील नाल्याला पूर आला. पुरातून वाट काढत घराकडे जात असताना संगीता वाहून गेली होती,महिलेचा मृतदेह धामणगाव रेल्वे रुग्णालयात शवविच्छेदन करीता पाठवण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *