पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शनातून पोलीस भरतीची तयारी केल्यास यश हमखास – शोध प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमदार सुलभाताई खोडके

  • जिल्हा स्टेडियम येथे तीन महिन्याच्या मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला सुरुवात
  • यश खोडके यांनी राबविली युथ व्हिजन ची संकल्पना

अमरावती २७ सप्टेंबर : आपल्या अंगीभूत कौशल्यातून अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शनाची पदोपदी गरज असते. स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करतांना विद्यार्थ्यांना अनेक आव्हाने पेलावी लागतात. पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षाच्या कोरोना मध्ये सराव बंद होता, आता पोलीस भरतीच्या ईच्छुक उमेदवारांकरिता नवा उत्साह व जोश निर्माण करण्यासाठी शोध प्रतिष्ठान च्या वतीने मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी मोठ्या जोमाने तयारी केल्यास व याला प्रशिक्षण व मागर्दशांची जोड मिळाल्यास यश हमखास मिळणार असल्याचे सांगून शोध प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी स्पर्धावंत विद्यार्थ्यांमध्ये स्प्रूल्लिंग चेतविले. सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी मोर्शी रोड स्थित जिल्हा स्टेडियम प्रांगणात शोध प्रतिष्ठानचे वतीने आयोजित मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

एकच ध्येय… आजची युवा पिढी मजबूत करण्याच….. हा ध्यास बाळगून शोध प्रतिष्ठानचे सचिव यश खोडके यांच्या युथ व्हिजन संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण व अभूतपूर्व अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यश खोडके यांनी मैदानाचे पूजन केले तर आमदार महोदयांनी हिरवी झेंडी दाखवित उद्घाटनाची औपचारिकता साधली . या दरम्यान विद्यार्थ्यांनी मैदानावर दौड लगावीत चाचणी पूर्व फिजिकल फिटनेसचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला. शोध प्रतिष्ठानचे हिरव्या रंगाची टी शर्ट परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी है तैय्यार हम चा जोश दर्शवित शिस्तबधपणे दौड लगावीत असतांना उपस्थितांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहित केले. अमरावती जिल्हा अँथलेटिक संघटनेचे सचिव-प्रा. डॉ. अतुल पाटील, पोस्ट ग्रॅज्युएट टिचिंग डिपार्टमेंटचे शुभम सोनोने , एनआयएस कोच प्रा . डॉ . डबीर कुरेशी सर यांनी शिबिराचे आयोजनाला घेऊन माहितीपूर्ण सूचना देण्यासह विद्यार्थ्यांना यावेळी महत्वपूर्ण टिप्स सुद्धा दिल्यात. मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करीत विद्यार्थ्यांकरिता अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून यश खोडके यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. या विधायक आयोजनाला घेऊन याप्रसंगी उपस्थित पालकवर्ग व क्रीडा प्रशिक्षक यांनी यश खोडके यांचे अभिनंदन केले. या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराकरिता आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात वर्ग प्रवेश/अभ्यासिका/शारीरिक आदी बाबीना घेऊन यापूर्वी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकरिता नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या शिबिराला लाभलेला प्रतिसाद, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा लक्षवेधी सहभाग, ध्येयं साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला निश्चयपूर्ण निर्धार यामुळे आजची युवा पिढी मजबूत होण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके, यश खोडके, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, एनआयएस कोच-प्रा. डबीर कुरेशी, अमरावती जिल्हा अथलेटिक संघटनेचे सचिव-प्रा. डॉ. अतुल पाटील, अथलेटिक प्रशिक्षक-सलीम शेख, राहुल जामनिक, शुभम सोनोने, ऍड. सुनील बोळे, ऋतुराज राऊत , संदीप आवारे, प्रवीण इचे, भूषण बनसोड, विनायकराव तळोळे, ऍड. अमित जामठिकर,प्रा .डॉ. अजय बॉंडे, अशोक हजारे, गजानन बरडे, सुनील रायटे, संजय बोबडे, दिनेश देशमुख, पप्पूसेठ खत्री, प्रमोद सांगोले, दीपक कोरपे, जवाहर व्यास, नितीन भेटाळू, मनीष देशमुख, मनोज केवले, लकीसेठ नंदा, शशिकांत चौधरी, जितेंद्रसिंह ठाकूर, किशोर भुयार, किशोर देशमुख, महेंद्र भुतडा, अजय दातेराव,डॉ. श्यामसुंदर सोमवंशी, भोजराज काळे, दिलीप कडू, दत्तात्रय उर्फ अण्णा बागल, राजू लुंगे, प्रमोद महल्ले, योगेश सवाई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, आकाश वडणेरकर, सुयोग तायडे, प्रवीण भोरे, महेश साहू, श्रीकांत झंवर, मनीष करवा, गोपाळ चिखलकर, आनंद मिश्रा, संजय मलणकर,प्रवीण मेश्राम, विजय बाभुलकर, संदीप आवारे, श्याम दळवी, मनीष बजाज, भूषण बनसोड, विनोद देशमुख, राजेश कोरडे, गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, कर्नालसिंग रहाल, प्रवीण आकोडे, सचिन वानखडे, आशिष सगणे, पिंटू मानकर ,शुभम पारोडे, शक्ती तिडके, चेतन वाथोडकर, अमोल देशमुख, रमेश मातकर, बंडू धोटे, जयकुमार नागे,रत्नदीप बागडे, महेंद्र सोमवंशी, अमोल वानखेडे, पंकज थोरात, राजेंद्र खोरगडे, मयूर झामबानी, संदीप गावंडे, नाना पानसरे, प्रा. रमेश काळे, प्रशांत यावले, आनंत जगताप,राजेंद्र कुरहेकर,सतीश रोंघे,मनीष पाटील, सागर इंगळे, प्रथमेश बोके, सारंग देशमुख, आदिल शेख, अर्पण सोनी, दिग्विजय गायगोले, जयेश सोनोने, शिवम कुंभलकर, कपिल यादगिरे, महेंद्र किल्लेकर, संकेत बोके, अभिषेक बोळे, अक्षय पळसकर, अभिषेक धुरजड, संदीप औशीकर , सनाउल्ला खान ठेकेदार, हबिबभाई खान ठेकेदार, सादिकभाई आयडिया, शकुर बेग,सयद साबीर, बबलू अंपायर, अबरार मोहम्मद सर, बाबाभाई ठेकेदार, शेख रेहान, नूरखा, अब्दुल सत्तार राराणी, डॉ. आबिद,फारुकभाई मंडपवाले, अक्रम अली, दिलबर शाह, अफसर बेग,नदिमामुल्ला सर,अफसर बेग, मोईन खान आदींसह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा स्टेडियम व शिवाजी बीपीएड प्रांगणात चालणार पोलीस पूर्व प्रशिक्षण
शोध प्रतिष्ठानचे सचिव यश खोडके यांच्या अभिनव संकल्पनेतून आयोजित तीन महिन्यांचे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण हे जिल्हा स्टेडियम व शिवाजी बीपीएड च्या भव्य प्रांगणात चालणार आहे. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण चार बॅच राहणार असून सकाळी ६.३० ते ८.०० वाजे पर्यंत पहिली बॅच व सायंकाळी ४.३० ते ६.०० वाजे पर्यंत दुसरी बॅचमध्ये दोन्ही ठिकाणी शारीरिक चाचणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यामध्ये मास्टर ट्रेनर कडून रनिंग, लॉन्ग जंप, पुल-अप्स, गोळाफेक सारख्या शारीरिक क्षमतांवर प्रशिक्षण होईल. तसेच साई कोचिंग क्लासेस राठी नगर येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजताच्या वेळेत गणित, मराठी, सामान्य ज्ञान, अभिक्षमता चाचणी आदी बाबत शिकवणी वर्ग घेतले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *