चांदुर रेल्वे येथील अपहरण प्रकरणातील आरोपी गजाआड

पोलीस चांदुर रेल्वे येथे अप.क्र . ४ ९ ८ / २०२२ कलम ३६३,४५२,५०४,५०६,३४ भादंवि सहकलम ४/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल होता . सदर गुन्हयात काही आरोपींनी अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते . सदर गुन्हयातील फरार आरोपी यांचा शोध घेत असता स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की , यातील फरार आरोपी नामे शेख अशफाक शेख चांद वय ३ ९ वर्ष रा . शिवाजी नगर चांदुर रेल्वे हा सध्या आष्टी जि.वर्धा येथे वास्तव्यास आहे . अशा माहितीवरुन आष्टी जि.वर्धा येथे सदर आरोपीचा शोध घेतला असता शेख अशफाक शेख चांद हा आष्टी बस स्टैंड येथे मिळून आला . त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे यांच्या ताब्यात देण्यात आले . सदरची कार्यवाही मा . श्री . अविनाश बारगळ , पोलीस अधीक्षक , अमरावती ग्रा . मा . श्री . शशिकांत सातव , अपर पोलीस अधिक्षक , अमरावती ग्रा . यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री तपन कोल्हे , स्थागुशा यांचे नेतृत्वात पोउपनि तसलीम शेख , अंमलदार त्रंबक मनोहर , शरद माहुलकर , उमेश बुटले , चंद्रशेखर खंडारे नितेश तेलगोटे यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *