*फायर इन्स्टॉलेशन कामाची एन.ओ.सी. देण्याकरिता 5000 रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी अग्निशमन अधीक्षक सैय्यद अन्वर यांना acb ने अटक केली आहे
यातील तक्रारदार हे फायर इन्स्टॉलेशन चे काम करत असून त्यांनी विठ्ठल बिल्डिंग, साईनगर, अमरावती येथे केलेल्या फायर इन्स्टॉलेशन कामाची एन.ओ.सी. देण्याकरिता अग्निशमन विभाग महानगरपालिका अमरावती येथील अग्निशमन अधीक्षक सैय्यद अन्वर हे 5000 रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची दिनांक 6/9/2022 रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता, अग्निशमन अधीक्षक सैय्यद अन्वर यांनी तक्रारदार यांना विठ्ठल बिल्डिंग, साईनगर,अमरावती येथे केलेल्या फायर इन्स्टॉलेशन कामाची एन.ओ.सी. देण्याकरिता 5000 रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक 7/9/2022 रोजी आयोजित सापळा कारवाईदरम्यान, अग्निशमन अधीक्षक सय्यद अन्वर यांनी लाचे संदर्भाने बोलनी केली परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. नमूद आरोपी लोकसेवक यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.