प्रशासक राज मध्ये मनपाचा मनमानी कारभार उद्यान विभागात कंत्राटी निरीक्षकाची नियुक्ती

anchor प्रशासक राज आल्यापासून महापालिकेत अनागोंदी कारभार सुरु झाला असून हम करे सो कायदा असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांनी आपलीच मनमानी चालविली आहे. इतकेच नाहीतर लोक प्रतिनिधींना न जुमानता सुद्धा प्रशासक राज मध्ये मनपा अधिकाऱ्यांनी गौडबंगाल चालविले असून आता चक्क कर्मचारी नियुक्तीला घेऊनही कार्यवाही केली आहे. अशाच प्रकारे मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाने उद्यान विभागात उद्यान निरीक्षक पदावर प्रतीक प्रमोद टोंगसे यांची कंत्राटी तत्वावर नियुक्तीची ऑर्डर नुकतीच २१ सप्टेंबर २०२२ रोजी काढली आहे. विशेष म्हणजे महापालिकेमध्ये इटकॉन्स कंपनीच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरविल्या जाते . या कंपनी मार्फत ही नियुक्ती निरीक्षक + सुपरवायझर अशी दाखविण्यात आली. असे कुठलेही दुहेरी पद मनपा उद्यान विभागात नाही , कंपनीच्या म्हणण्यानुसार ही नियुक्ती सुपरपायझर पदासाठीची आहे . परंतु ,मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधिक्षकांनी प्रतीक प्रमोद टोंगसे च्या नियुक्तीला घेऊन कंत्राटी उद्यान निरीक्षक अशी ऑर्डर उपायुक्तांच्या स्वाक्षरी निशी काढली आहे. उद्यान विभागात जवळपास काही कर्मचारी हे बीएस्सी ऍग्री कल्चरल अशी अर्हताधारक असून त्यांच्या कडे जवळपास सात -आठ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे उद्यान निरीक्षक पदासाठी पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित असतांना केवळ दोनच दिवसात प्रतीक प्रमोद टोंगसे नामक उमेदवाराची तडकाफडकी ऑर्डर काढून त्यांना रुजू करण्यात आल्याने प्रशासक राज काळातील मनपाची अनागोंदी उघड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *