दिवाळीच्या दिवशी नागरिकांनी चिखलात दिवे लावून केले अनोखे आंदोलन, शिक्षक कॉलनीतील नागरिकांची गांधीगिरी

अनेक वर्षांपासून नगरपरिषदने केले दुर्लक्ष

दर्यापूर (ता.प्रतिनिधी) – दिवाळी हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येते, घरोघरी दिव्यांची आरास लावण्यात येते, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या दिवाळीच्या दिवशी दर्यापूर शहरातील गायत्री नगर परिसराच्या बाजूला असलेले शिक्षक कॉलनी या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षांपासून गायत्री नगरातील नागरिकांच्या घराचे संपूर्ण सांडपाणी तलावाच्या स्वरूपात येथील रहिवाशांच्या घरासमोर साचलेले आहे.

या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या सांडपाण्यामुळे मोठमोठे साप, अजगरांचे दर्शन होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. विषय म्हणजे नगरपालिकेला या संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आज पारिजात शिक्षक कॉलनी या परिसरातील नागरिकांनी सासलेल्या गढूळ पाण्यामध्ये दिवे लावून गांधीगिरी पध्दतीने अनोळखे आंदोलन करून दर्यापूर नगरपालिकेचा निषेध केलेला आहे. त्यामुळे आता यावर नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या या समस्याकडे लक्ष देणार का की झोपेची सोंग घेणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.

“दर्यापूर नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेने यावर 4 वर्षे पासून पर्यायी मार्ग काढला नाही,नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेने यावर काही तोडगा काढला नाही स्थानिक प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष घालण्याची गरज आहे व नगरपरिषदेने आम्हाला पर्यायी मार्ग काढून नाली काढून दयावी सांडपाण्याचा खूप त्रास होत आहे साप असे प्राणी घरा मध्ये निघत आहे.”
– श्री नंदकिशोर रायबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *