स्कॉलर्स कॉन्व्हेंट, सी बी एस ई मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा

संविधानाचे पालन करण्याची घेतली शपथ, रॅलीतून संविधानाचे महत्व..

अमरावती । २६ नोव्हेंबर संविधान दिवस अमरावतीच्या दसरा मैदान येथील स्कॉलर्स कॉन्व्हेंट, सी बी एस ई मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री अय्यंगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करण्यात आलं. त्यानंतर कु. कस्तुरी शिंदे, पूर्वा मोहोड, नमन पोची व स्वरा देशमुख यांनी संविधान दिनाचे महत्व सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

संविधानाचे महत्व नागरिकांमध्ये जागृत करण्यासाठी शाळेच्या वतीनं रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. कु. जाहरा बोहरी या विद्यार्थिनी सह शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षिकांनी भारतीय संविधानाचे जतन करण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्ग ६ ची विद्यार्थिनी कु. समीरा कुबडे हिने केले असून संविधान दिनाचा कार्यक्रम प्रतिभा उ. तुपाडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. तसेच सपना कटरे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *