अमरावती । मनपाच्या उच्च माध्यमिक शाळा क्र. ८ जमील कॉलनी मध्ये इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेची मान्यता

  • मनपा शाळांचा दर्जा वाढीला घेऊन आमदार सुलभाताई खोडके यांच्या पाठपुराव्याला यश
  • महापालिकेच्या पाच उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर नववी व दहावीचा वर्ग

अमरावती २९ नोव्हेंबर : विदर्भाची शैक्षणिक नगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अमरावती मध्ये आता नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आली आहे. अमरावती महानगर पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब व श्रमजीवी वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी , म्हणून अमरावती महापालिकेच्या पाच उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचा वर्ग तसेच जमील कॉलनी येथील उच्च माध्यमिक शाळा क्र . ८ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच इयत्ता अकरावी व बारावीची विज्ञान शाखा सुरु करण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला . या संदर्भात अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न फळास आल्याने तमाम अमरावतीकर जनता तसेच अल्पसंख्याक बहुल भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती शहरी भागात अनेक खाजगी शाळा सुरु असल्या तरी गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना महागडे शिक्षण परवडत नसल्याने त्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावं लागत . मात्र या शाळांची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शैक्षणिक दर्जा सुधारला नसल्याने याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर दिसून येत होता . या संदर्भात अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आढावा घेतला . तसेच मनपाच्या शाळांची प्रत्यक्षरित्या पाहणी करीत शैक्षणीक दर्जा , व भौतिक सुविधांचा आढावा घेतला . यावेळी असे निदर्शनास आले होते की, महापालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या इमारती , उत्कृष्ट स्टाफ उपलब्ध असतांना सुद्धा चांगल्या व नाविन्यपूर्ण शिक्षणाची सोय नसल्याने गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून मुकावं लागत होत . या संदर्भात आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी पुन्हा मे २०२२ मध्ये मनपाच्या शिक्षण विभागाचा आढावा घेऊन मनपाच्या निवडक ८ उच्च प्राथमिक शाळांमध्ये दर्जा वाढ करून वर्ग नववा व दहावा वर्ग सुरु करण्यात यावा तसेच मनपा उच्च माध्यमिक शाळा क्र.८ जमील कॉलनी येथे वर्ग अकरावी व बारावीचा वर्ग सुरु करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मनपाचे शिक्षणाधिकारी डॉ. अब्दुल राजिक यांना केली होती. दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अमरावतीच्या शैक्षणिक विकास व गरीब , गरजू तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच उच्च शिक्षण घेऊ इच्छितणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सदर प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती शासनाकडे केली होती . अमरावती मनपा उर्दू माध्यमिक शाळा येथे नववी व दहावी च्या वर्गात उत्कृष्ट पटसंख्या आहे. तेथे कनिष्ठ महाविद्यालयाचे चांगले प्रयोजन होऊ शकते , व आसपासच्या परिसरातील मुलांना चांगली सोय देखील उपलब्ध होईल , याकडे सुद्धा आमदार महोदयांनी शासनाचे लक्ष वेधले . याची फलश्रुती म्हणून आता अमरावती महापालिका द्वारा संचालित पाच उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्यास शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. यामध्ये मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक २ अलीम नगर , मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ६ चपराशी पुरा अमरावती , मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक ११ भाजी भाजार अमरावती , मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १४ वडाळी , मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १३ चपराशीपुरा या पाच शाळांचा समावेश आहे. तर मनपा उच्च माध्यमिक शाळा क्रमांक ८ जमील कॉलनी येथे कनिष्ठ महाविद्यालय अर्थात इयत्ता अकरावी व बारावीचे विज्ञान शाखेचे वर्ग सूर करण्यास देखील मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून आता गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध होणार आहे. अल्पसंख्यांक बहुल भागातील मनपाच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारून उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केल्या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे शहराच्या शैक्षणिक वर्तुळात अभिनंदन केले जात आहे. तसेच सनाउल्ला सर , गाजी जाहेरोश , हाजी रफिक शाह, सना भाई ठेकेदार , अबरार साबीर , अफसर बेग , नदीमुल्ला सर , वाहिद भाई इन्कलाब , सैय्यद साबीर , हबीब खान , नाजीम सर , अख्तर भाई, फारुख भाई मंडपवाले , सादिक आइडिया , अब्दुल सत्तार राराणी सादिक कुरेशी , सादिक रजा, वाहिद शाह , नईम भाई चुडी, अजमद पहेलवान , सनी पठाण , बबलू अंपायर , साबीर पहेलवान, डॉ . रहीम पप्पू ,डॉ . करीम शाह , कलीम भाई समाजसेवक , दिलबार शाह , यांनी आ. सौ . सुलभाताई खोडके यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती मनपाच्या शैक्षणिक विकासात नवी क्रांती- आ.सौ. सुलभाताई खोडके

गेल्या मे महिन्यात अमरावती मनपा उर्दू माध्यमिक शाळा क्र ८ ला भेट देऊन पाहणी केली असता तेथील नववी व दहावी च्या वर्गात उत्कृष्ट पटसंख्या तसेच भौतिक सुविधा व मनुष्यबळ चांगली असल्याने तेथे कनिष्ठ महाविद्यालयाचे चांगले प्रयोजन होऊ शकते,असे निदर्शनास आले. सदर भागात अनेक गरीब विद्यार्थी असून केवळ उच्च शिक्षण मिळत नसल्याने त्यांनी शाळा सोडली, तसेच शहरीभागातील कॉलेज लांब पडत असल्याने त्यांनी अर्धवट शिक्षण सोडले असल्याचे सुद्धा निदर्शनाचे आले. त्यामुळे सदर शाळेत अकरावी व बारावी चे वर्ग सूरु केल्यास जमील कॉलनी भागात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांबरोबरच आसपासच्या वलगाव रोड व भातकुली रोड वरील खेडोपाड्यांतील विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची सोय होईल , या दिशेने चाचपणी केली. तसेच मनपाच्या पाच उच्च प्राथमिक शाळेमध्ये दर्जावाढ करून नववी व दहावीची माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत सुद्धा शासनाकडे पाठपुरावा केला . यास शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत असून अमरावती मनपाच्या शैक्षणिक विकासात नवी क्रांती झाल्याने मनस्वी आनंद होत आहे.

सौ. सुलभाताई संजय खोडके, आमदार अमरावती विधाससभा मतदार संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *