नांदगाव खंडेश्वर | धामक येथे बहिरम बाबा यात्रे निमित्त कुस्ती दंगल, राजु पहेलवान वारा ठरला विजेता

बहिरम बाबा यात्रे महोत्सवानिमित्त श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ च्या वतिने कुस्ती चे दंगल आयोजित केलेले होते. महाराष्ट्रातील नामवंत पहेलवान धामकच्या मातीत कुस्ती खेळण्याकरता अनेक डावपेचामध्ये मग्घ झाले होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक हे गाव कुस्तीच्या दंगल मध्ये प्रसिद्ध आहेत, त्यामुळे इथे यवतमाळ, नेर, कांरजा, वारा, मोखड, वाशिम, माणिकवाडा, येरड येथून पैलवान खेळण्याकरीता येतात. कुस्ती दगंलचे उद्घाटक वीरेंद्र जगताप माजी आमदार धामणगाव रेल्वे ज्ञानेश्वर ज्ञाने पाटील माजी आमदार, शिवसेना नेते बाळासाहेब राणे, विष्णुपंत तीरमारे, प्रकाश मारोटकर, अमोल धवसे, विलास पाटिल सावदे, अक्षय पारसकर, रमेश ठाकरे, श्याम राऊत, उपसरपंच अजय निर्मळ, कमलचंद गुगलीया, अरविंद निर्मळ, शेख जाफर शादिक शेख अनसार भाई, सुरेश वैष्णव, शेख रहेमान, रामदास लष्करे, शेख गुलाम रसुल शेख मुमताज, कुस्ती पंच दत्ताजी पाटिल व विजय झाडे, कार्यक्रमाचे बक्षीस वितरण तळेगाव पोलीस स्टेशन ते ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीर खा पठाण यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष पवन ठाकरे यांनी केले.

धामक येथिल पहेलवान यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री बहिरम बाबा यात्रेनिमित्त धामक नगरी मध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज महिला भजनी मंडळ अनेक दिंडी सोहळा सहभागी झाल्या होत्या नंतर काल्याचे हरी कीर्तन ह भ प राजेंद्र महाराज मस्के यांचे होते नंतर संस्थान च्या वतिने महाप्रसाद अंदाजे 5000 ते 6000 लोकांनी श्रवण केला आयोजित करण्यात आला होता असे संस्थान च्या विश्वात मंडळी ने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *