अधिकारी,कर्मचारी क्रीडा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी आठ पं.स.मधिल कर्मचारी यांनी सादर केले विविध कलाविस्कर

अमरावती दि.१४-अमरावती जि.प.अधिकारी,कर्मचारी क्रीडा महोत्सव एच व्ही पी एम अमरावती येथे सुरु आहे.पहील्या दिवसी आठ पंचायत समिती मधिल अधिकारी,कर्मचारी यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यामध्ये धामणगाव रेल्वे,वरुड,अंजनगाव सुर्जी,अचलपूर,चांदुल रेल्वे,धारणी,मुख्यालय व नांदगाव खंडे यांनी भक्तीगीत,भावगीत,लोकगीत,सीनेगीत,कराओके,समुहगान,एकलनृत्य,नाटिका,एकांकीका,अभिनय असे प्रकार सादर केले,प्रत्येक पं.स.ला ३०मिनिट वेळ देण्यात आला होता.याचे परीक्षण करण्याकरीता समर कनकुरे,मनिषा विटणकर,रत्नाकर सिरसाट,सुरेश चिमणकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन शकिल अहमद सर यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये धामणगाव पं.स.मधिल दिनेश शर्मा यांनी देशभक्ती गीत,एकल नृत्य किरण कशराम,प्रगती तिजारे व टिम यांनी नाटिका सादर केली.वरूड मधिल सोमेश्वर हरले व संच यांनी समुह नृत्य तर संगिता टेकाडे व संच लोकगीत सुधाकर वाघमारे व संच यांनी आणि अमृता नायसे यांनी एकल नृत्य सादर केले.अंजनगाव सुर्जी मधिल सुधिर खोडे यांनी जरीच्या चोळिला हे लोकगीत सादर केले,देऊ विकासावर भर यावर अभिनय आधारीत जनजागृती नाटिका सादर केली.मीना धरमठोक व संच यांनी समृह नृत्य सादर केले.
धारणी मधिल योगिता जिरापूरे यांनी एकल नृत्य,साधना इंगोले यांनी सिनेगीत तर शैलेश चौकसे कराओके गीत,शुभांगी निंबोळे व संच यांनी नाटिका सादर केली.मुख्यालय अमरावती मधिल सुनिल इंगोले भक्तीगीत,आदित्य तायडे यांनी एकल नृत्य सादर केले.प्राजक्ता राऊत यांनी एकांकीका,किरण खांडेकर व संच यांनी समुह नृत्य,अर्चना मानकर,तिरमुडे यांनी लावणी सादर केली.नांदगाव खंडे मधिल लिना उमके व संच समृह नृत्य,तृप्ती शिंगणवाडे एकल नृत्य,छाया पोटेकर एकपाञी अभिनय,राजेन्द्र जाधव यांनी लोकगीत तर अलका खोपे व संच यांनी नाटिका सादर केली.आज उर्वरीत आठ पं.स.चे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाला जि.प. व पं.स.चे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.असे कार्यक्राचे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर व राजेन्द्र दिक्षित यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *