क्षुल्लक कारणावरून तरुणाला संपवलं; हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद

ठाणे : चाकू भोसकून एका २० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथे घडली आहे. अंकुश राज असे या हल्ल्यात मृत तरुणाचे नाव असून हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावर फरार झाले आहेत.

मीरा रोड पूर्वेकडील शांतीपार्क परिसरातील जांगिड सर्कल येथे अंकुश राज (वय २०) हा एका ई – शॉपिंग कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो काही कामानिमीत्त एका ठिकाणी उभा होता. त्यावेळी चार ते पाच जणांनी त्या ठिकाणी येत अंकुशवर प्राणघातक हल्ला केला. या आरोपींनी चाकू भोसकून अंकुशला गंभीररीत्या जखमी केले व हल्ला करुन सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले

काल सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून हल्ला करत मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुशला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास मीरा रोड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *