विश्वकर्मा जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लोहार समाजाचा उपक्रम

यवतमाळ / प्रतिनिधी

असंख्य कारागिरांचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लोहार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभू विश्वकर्मा जयंतीचे आयोजन जिल्हा लोहार समाज बांधवांकडून येत्या ३ फेब्रुवारीला आर्णी रोडवरील कंवरराम भवन येथे करण्यात आले आहे. या निमित्याने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी समाज बांधवांना मिळणार आहे. समाजातील दहावी, बारावीमधे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे खंजेरी भजनाचा कार्यक्रम, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची यासह आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर लोहार समाजा समोरील विविध आवाहने, समस्या समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. लोहार समाजातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी यांनी गुणपत्रिकेची छायांकीत प्रत संस्थेच्या सदस्या पर्यंत देण्याचे आवाहन यावेळी विश्वकर्मा लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत शेलोटकर,उपाध्यक्ष विट्ठल कळसे, सचिव दामोदर कळसे, सहसचिव देविदास पाटमासे,सदस्य मारोती जवने,संजय पराळे,विजय पाटमासे, वसंत कळसाईत,प्रशांत ढोले, संजय शेलोटकर, गणेश गुजर,अमोल पराळे, चंद्रभान कळसकर,सरिता ढोले, सुषमा कळसाईत. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *