सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमंलदार यांचा निरोप समारंभ पोलीस अआयुक्ताच्या हस्ते सत्कार

पोलीस आयुक्तालय , अमरावती शहर आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी अमंलदार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज दिनांक ३१/०१/२०२३ रोजी आयोजीत करण्यात आला कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी अमंलदार १ ) स.पो.उपनि ६८४ दिगांबर किसन चोरपगार नेमणुक पोलीस मुख्यालय , अमरावती शहर २ ) पोहवा / ५११ मोहन विठ्ठल काळे नेमणुक पोलीस मुख्यालय , ३ ) पोहवा / ८ ९ ३ अशोक शंकरराव बुंदेले नेमणुक पो.स्टे . कोतवाली ४ ) पोना / २३२ दिलीप निळकंठ अतकरे पो.स्टे.गाडगेनगर यांचा मा . पोलीस आयुक्त श्री . नवीनचंद्र रेड्डी यांचे हस्ते शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ सेवानिवृत्ती प्रमाणपत्र तसेच अमरावती शहर पोलीस आयुक्तालय तर्फे मानचिन्ह देवून कौटुंबिक वातावरणात सत्कार करण्यात आला . सेवानिवृत्त पोलीस अमंलदार यांना त्यांचे पुढील भविष्याकरीता व सुदृढ आरोग्य करीता कुटुंब प्रमुख या नात्याने शुभेच्छा देवुन सेवानिवृत्ती काळात त्यांचे शासकीय सुविधेबाबत काही अडचणी आल्यास त्याबाबत संपर्क करणेबाबत सुचित केले यावेळी श्री . सागर पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्री . किशोर शेन्डें प्रशासकीय अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार यांचे कुटुंबीय व इतर पोलीस अधिकारी / अमलदार हजर होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *