यवतमाळ येथे गुरूवारी विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव ‘शिवश्री -२०२३’ स्पर्धा शिवसदासराव लोखंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजन; दोन लाख रूपयांच्या बक्षीसांची लयलूट

श्रीकांत खोब्रागङे यवतमाळ :

धकाधकीच्या जीवनशैलीत तरूणांनी व्यायामाकडे वळून व्यसनांपासून दूर राहावे आणि उत्तम आरोग्य राखावे, हा संदेश देण्यासाठी यवतमाळ येथे गुरूवार, २ फेब्रुवारी रोजी विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा ‘शिवश्री -२०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक बालाजी सोसायटीतील वीर सावरकर मैदान (रंगोली ग्राऊंड) येथे सायंकाळी ५.३० वाजता या स्पर्धेस प्रांरभ होणार असल्याची माहिती आज मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने अविनाश लोखंडे यांनी दिली.
बॉडी बिल्डर्स ॲन्ड फिटनेस असोसिएशन विदर्भच्या मान्यतेने व यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स ॲन्ड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने शिव आणि शिवनेरी मसल्स अॅन्ड फिटनेस जिम मित्रपरिवारातर्फे स्व. शिवदासराव लोखंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे अविनाश लोखंडे यांनी यावेळी सांगितले. या स्पर्धेत १५ विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. विदर्भ टॉप टेन गटात ३१ हजार रूपयांचे पहिले बक्षीस स्व. डॉ. शीतल जिरापूरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिले जाणार आहे. २५ हजार रूपयांचे दुसरे बक्षीस स्व. चंद्रशेखर देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ, २१ हजार रूपयांचे तिसरे बक्षीस स्व. सुरेश भुसारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ, १५ हजार रूपयांचे चौथे बक्षीस स्व. आकारामजी पाचपोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ, प्रत्येकी ११ हजार रूपयांचे पाचवे आणि सहावे बक्षीस अनुक्रमे स्व. विजयाताई घुईखेडकर आणि स्व. बाळासाहेब पांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ, प्रत्येकी ७ हजार रूपयांचे सातवे आणि आठवे बक्षीस अनुक्रमे स्व. सुधाकर धलवार आणि स्व. निर्मलाबाई दरेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ, तर प्रत्येकी ५ हजार रूपयांचे नववे आणि दहावे बक्षीस अनुक्रमे स्व. विजयराव भुरचंडी आणि स्व. पंचफुला शेलार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिले जाणार आहे.
जिल्हास्तरीय फाईव्ह टॉप शरीर सौष्ठव गटात १५ हजार रूपयांचे पहिले बक्षीस स्व. हरिदास भागवत यांच्या स्मृती प्रित्यर्थ, ११ हजार रूपयांचे दुसरे बक्षीस स्व. रामरावजी वासेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ, ७ हजार रूपयांचे तिसरे बक्षीस स्व. दामोधर खरात यांच्या स्मृती प्रित्यर्थ, ५ हजार रूपयांचे चौथे व ३ हजार रूपयांचे पाचवे बक्षीस स्व. पांडूरंगजी पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातील शरीर सौष्ठवपटू सहभागी होणार आहेत. कोरोना काळानंतर प्रथमच या पद्धतची शरीर सौष्ठव स्पर्धा यवतमाळात होत असल्याने तरूणांमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता असून अनेकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली असून १०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजय भोयर, सर्वेश शाहू, कमलेश कश्यप, हर्षल यावले, राजेश क्षीरसागर आदी बॉडी बिल्डर स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
तरूण पिढीने व्यसनांपासून दूर राहून व्यायामासह आरोग्यकडे लक्ष द्यावे, यासाठी स्पर्धेद्वारा संदेश दिला जात आहे. यवतमाळच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा स्पर्धेत गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा क्षेत्रासह शिव आणि शिवनेरी मसल्स अॅन्ड फिटनेस जिम मित्रपरिवार परिश्रम घेत आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आनंद भुसारी, धनंजय लोखंडे, सचिन भेंडे, निखील धलवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही पत्रकार परिषदेत आयोजकांनी केले. पत्रकार परिषदेला अनंत पांडे, राजेंद्र देशमुख, सचिन जिरापूरे, धनंजय लोखंडे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.
चौकट
उत्कृष्ट शरीर सौष्ठवपटूसाठी ‘शिवश्री-२०२३’ मानाची गदा
स्पर्धेत उत्कृष्ठ शरीर सौष्ठव कामगिरीसाठी प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या स्पर्धकास रोख बक्षीसासह स्व. शिवदासराव लोखंडे स्मृती प्रित्यर्थ ‘शिवश्री -२०२३’ ही मानाची गदा देवून गौरविण्यात येणार आहे. विविध पोझमध्ये शरीर सौष्ठवाचे उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास स्व. श्याम मेहता स्मृती प्रित्यर्थ ‘बेस्ट पोझर’ हा सात हजार रूपयांचा पुरस्कार दिला जाईल. स्पर्धेत कमी कालावधीत शरीर सौष्ठव विकसित करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास स्व. इंदिरा आनंदराव गावंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सात हजार रूपयांचा ’बेस्ट इम्प्रुव्हड’ हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *