जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा महोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन

या विद्यार्थ्यी जिल्हा क्रीडा महोत्सव स्पर्धा २०२३ मध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे १ हजार ७३६ विद्यार्थी व ३४२ खेळ प्रभारी शिक्षक सहभागी झाले आहे. या क्रीडा महोत्सवात कबड्डी,खो -खो,लंगडी,व्हालीबॉल,टेनिकवाईत,बॅडमिंटन, १०० मिटर धावणे,७५ मिठर धावणे,बटाटा शर्यत,दोरीवरच्या उड्या, पोत्याची शर्यत,तीन पायांची शर्यत,रिले रेस,लांब उडी,उंच उडी,कुस्ती,आदि खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या क्रीडा महोत्सवात आपल्या अंगीभूत क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करीत विद्यार्थ्यांच्या वतीने दर्जेदार कामगिरी बजावली जात आहे. ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या वतीने आम्हाला फक्त एकच संधी हवी, त्याचे सोने करण्याची आम्ही देतो हमी…..असा अनोखा संदेश देत प्रत्येक खेळात प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यासाठी जिद्द,विजयाचे ध्येय,लक्ष्य साधण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत,ही भूमिका व्यक्त करीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्या जात आहे. विद्यार्थी जिल्हा क्रीडा महोत्सव स्पर्धा २०२३ च्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा संयोजक-डॉ. नितीन उंडे यांचे सर्व सहकारी व सर्व समितीचे पदाधिकारी व सदस्य अविरतपणे कार्यरत आहे. यावेळी क्रीडा संयोजक-डॉ. नितीन उंडे यांनी दिली प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *