अमरावती : प्रेयसीला ज्या झाडाखाली भेटायचा, त्याच झाडाला प्रियकराने घेतला गळफास

अमरावती – प्रेयसीचा साखरपुडा झाल्याचा धक्का न पचवता आल्याने युवकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. अनुभव धाकडे (33) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून शेजारील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघेही रहाटगावनजीक असलेला शेतात भेटत होते, लग्नही करणार होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने मुलीचे दुसरीकडे लग्न जमवण्यात आले होते.

अनुभव आणि त्याच्या प्रेयसीने एकमेकांना लग्नाचे वचन दिले होते. ते लग्नसुद्धा करणार होते. मात्र, आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती समजल्याने तो दु:खी झाला. त्यानंतर, ज्याठिकाणी झाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अनुभवने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये आत्महत्येस प्रेयसी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चिठ्ठी लिहिण्यापूर्वीच आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

चिठ्ठीतील मजूकर

त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याआधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते. परंतु, त्यांनी फाशी घ्यायची धमकी दिल्यामुळे तुझा विचार बदलला. माझ्यावर बलात्काराची केसही करणार होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *