अमरावतीत बेबी केअर सेंटरला लागली आग । दोन बालके किरकोळ जखमी

नुकतीच अमरावतीत जिल्हा रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र लहान मुलांच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या या आगीत दोन बालके किरकोळ जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धुरामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुकल्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. सध्या त्यांच्यावर इलाज सुरु असून बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.. तर अग्निशामन दलाने दोन पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने हि आग नियंत्रणात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *