यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई

यवतमाळ (प्रतिनिधी): यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे काउंटडाऊन सुरू झाले असून या मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. भाऊ की ताई यापैकी कोण निवडून येणार अशी चर्चा जोरात असून कार्यकर्त्यांची मात्र प्रचाराची लगीनघाई सुरू आहे. उमेदवार मात्र प्रचारात व्यस्त असून मतदारात मात्र सुस्तपणा जाणवत असल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात दिसून येत आहे.
या मतदारसंघात दोन सेनेत काट्याची लढत होत असून वंचित चा उमेदवार नामांकनातून बाद झाला असला तरी समनक जनता पार्टीचे प्राध्यापक अनिल राठोड यांना वंचित ने पाठिंबा जाहीर केला असल्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली असून मत विभाजनाचा फटका कुणाला बसतो याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दुसरीकडे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी देखील निवडणुकीत रंगत आणली असून ते बंजारा समाजाचे नेतृत्व करीत असल्यामुळे बंजारा मत विभाजनाचा फटका देखील आघाडी व युतिच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरिभाऊ राठोड यांना गोंडवाना समाज पक्षाच्या संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. हरी लढत आघाडीचे देशमुख व युतीच्या राजश्री पाटील यांच्यात होताना दिसत आहे. कार्यकर्ते प्रचाराला जोमाने कामात लागले असून बैठका सभा यात गुंतलेले दिसत आहे.

बॉक्स
अवघ्या दोन दिवसात येऊन ठेपलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता गावागावात पारावर रंगत आहे .खरा मतदार हा गावात असून प्रचंड प्रमाणात मतदान करण्याकरिता उत्सुक असतो. यावेळी मात्र मतदारांमध्ये सध्या तरी सुस्तपणा जाणवत असून येत्या दोन दिवसात मतदाराचा उत्साह देखील वाढण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने उमेदवार मतदाराला आकर्षित करू पाहतो, त्यावर मतदारांचा उत्साह टिकून असतो.

बॉक्स
उद्यापासून प्रचार, तोफा थंडावणार
26 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला असून येत्या 24 तारखेपासून प्रचार तोफा थंडावणार असल्याने कार्यकर्त्यात प्रचाराची प्रचंड लगबग दिसून येत आहे आहे. कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पूर्णता स्वतःला प्रचार कार्यात झोकून दिले आहे .उमेदवाराचा उत्साह देखील प्रचाराप्रती कायम असून कधी न बघता यावेळी निवडणूक प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात महिला उतरल्या असून महिलाच या निवडणुकीत रंगत आणणार असे चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *