भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार बहाल केले-आमदार सौ.सुलभाताई खोडके

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सर्व समाजघटकांचा साकल्याने विचार करणारे,संविधाननिर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीदिनी आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी केले विनम्र अभिवादन

महामानवाच्या पुतळा परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय चा एकच जयघोष

अमरावती (प्रतिनिधी )दिनांक १४ एप्रिल-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत होते.त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता.मानवमात्राच्या उत्थानासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष केला. लोकशाही, राष्ट्रवाद,सामाजिक न्याय या संकल्पना मनामनात रुजवताना त्यांच्यातला प्रज्ञावंत अभ्यासक सतत जागृत होता.या प्रज्ञेला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या कारुण्याची जोड होती. डॉ.आंबेडकर हे एक समाजचिंतक, लोकशिक्षक, राजनीतिज्ञ,कायदेपंडित, कृषीतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, धर्मज्ञानी,इतिहासकार,धुरंधर राजकारणी,स्त्रीमुक्तीचे उद्गाते,मानवतावादी समाजसुधारक, प्रतिभासंपन्न लेखक आणि उत्तम पत्रकार-संपादक होते. ‘ मी पहिल्यांदा भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय ‘ अशी निःसंदिग्ध ग्वाही देणारे प्रखर राष्ट्रभक्त होते.बाबासाहेबांनी संपूर्ण समानतेच्या दृष्टीने महिलांच्या समस्येचा वेध घेतला.’ महिलांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल,त्यावरून त्या देशाच्या प्रगतीचे मोजमाप करता येते, ‘ असे त्यांचे म्हणणे होते.असे प्रतिपादन आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले.रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी अमरावती येथील रेल्वे स्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक मार्ग परिसर स्थित जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सर्वप्रथम आमदार सौ.सुलभाताई खोडके व यश खोडके यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सर्व समाज घटकांचा साकल्याने विचार करणारे ,स्त्रीमुक्तीचे उद्गाते,संविधान निर्माते,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ वा जयंतीदिनी सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यादरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्विन चौक ) परिसर स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी हारार्पण करीत विनम्र अभिवादन केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार,समानतेचा अधिकार,शोषणाविरुद्ध अधिकार,सांस्कृतिक अधिकार व शैक्षणिक अधिकार असे पंचशील संविधानाच्या माध्यमातून दिले आहे. याचे स्मरण करून यावेळी सर्व उपस्थितांच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय असा एकच जयघोष करण्यात आला.याप्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *