टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले,

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर राज्यातून आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं चांगलंच धारेवर धरलं आहे. टाटा एअर बस प्रकल्पही गुजरात जाणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आपला महाराष्ट्र पुढे चाललाय की मागे चाललाय हे आपण ठरवायचं ?’ असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले,’चौथा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे. बल्क ड्रग पार्क, वेदांता, टाटा एअर बस प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला आहे. आम्ही जुलैपासून आरडा-ओरडा करत होतो की, हा प्रकल्प जायला नको तरीही हा प्रकल्प गेला. घटनाबाह्य सरकार आल्यानंतर एक इंजिन सरकारच फेल झालेलं आहे’.

‘कोणत्याही गुंतवणूकदाराला इकडे येण्यावर विश्वास नाही. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आपला महाराष्ट्र पुढे चाललाय की मागे चाललाय हे आपण ठरवायचं ? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *