50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक, 27 कोटीला ट्रक लागला मग 50 कोटींना..

नंदूरबार, 29 ऑक्टोबर : शिंदे गट शिवसेनेतूनफुटल्यापासून ठाकरे गट त्यांच्यावर सडकून टीका करत आहे. यातील मुख्य आरोप 50 कोटी अर्थात 50 खोके घेतल्याचा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनीच शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप केला. यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे. यावर आता खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये धाड पडली तेव्हा 27 कोटी रुपयांसाठी टेम्पो लागला. मग 50 कोटींचे ट्रक का दिसले नाही? लोकांची दिशाभूल करू नका, पैशाच्या लालसेपोटी हे 40 आमदार माझ्यासोबत आले नाहीत. या पनान्स लोकांना बदनाम करण्याचं काम तुम्ही कराल तेवढं खड्यात लोक तुम्हाला टाकतील, जनाची नाही तर मनाची ठेवा. यामुळे शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. नंदूरबार येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

औद्योगिक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे यावरून जो काहूर माजला आहे, त्याला योग्यवेळी घटनांनी स्वतः उत्तर देईल, सध्या उद्योगमंत्री याबाबत बोलत आहेत. विरोधकांना मी कामातून उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *