मैदाने विकसित करून क्रीडा सुविधांच्या पूर्ततेवर भर – आ. सौ. सुलभाताई खोडके

  • मारुस द्वारा आयोजित टीचर प्रीमियम लीग सीजन -३ चा थाटात समारोप
  • नोव्हेल इंडियन्स ने पटकावले अजिंक्य पद , टीटीएन इलेव्हन ठरले उपविजेता

अमरावती २९ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना अमरावती अर्थात मरुस च्या वतीने स्थानिक ए. पी. जे अब्दुल कलाम ग्राउंड (निदा ग्राऊंड ) येथे आयोजित सहारा टीचर्स प्रीमियम लीग सीजन -३ चा शनिवारी शानदार समारोप झाला. दरम्यान स्पर्धेतील अंतिम सामना नोव्हेल इंडियन्स विरुद्ध टीटीएन इलेव्हन मध्ये खेळल्या गेला. यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांची विशेष उपस्थिती लाभली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी रफिक भाई, ब्लॉक अध्यक्ष प्रा. सनाउल्ला खान सर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहिदभाई इन्कलाब, सनाभाई ठेकेदार, नदीमुल्ला सर, वसी खान सर, सैय्यद साबीर, हबीब ठेकेदार, माजी नगरसेविका लुबना तन्वीर तसेच या स्पर्धेत सहभागी नोव्हेल इंडियनचे संघ मालक साजिद खान, डायमंड वारियर्स चे मेराज खान पठाण, साद वारियर्स चे अहमद शहजाद, महाराष्ट्र कला शिक्षक व प्रशिक्षण महाविद्यालय अमरावतीसंघाचे एजाज अहमद, जारून सोल्जरचे जुनेद अहमद, गाडगेबाबा क्रीडा मंडळ संघाचे मालक श्रीकांत देशमुख, मारुस सुपर किंगचे मोहम्मद समिरुद्दीन, तसेच शालिमार इंडियन्सचे एस. के. नौशाद, वासिक रायसिंग स्टार चे संघमालक अतिकुर्र रहेमान, तसेच टीटीएन इलेव्हन चे संघमालक ताहीर नूर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धेचे मुख्य आयोजक इमरान मुन्नवर सर, मजर हाश्मी, हॅरिस खान यांनी आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच टीचर्स प्रीमियम लीग चा यंदा तिसरा हंगाम असून शिक्षकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत आमदार महोदयांना अवगत केले. तर शिक्षकांना तणाव विरहित ठेवून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या टीचर प्रीमियम लीग या क्रिकेट स्पर्धेचे सौ. सुलभाताई खोडके यांनी भरभरून कौतुक केले. शहराच्या मातीतून चांगल्या दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे, तसेच नागरिकांच्या शारीरिक अभिक्षमतांचा विकास व्हावा, क्रीडा कौशल्य वृदिंगत व्हावे, यासाठी क्रीडा विकासाच्या कृती आराखडा सुयोग्य पद्धतीने राबविला जात आहे. विभागीय क्रीडा संकुल, जुने विदर्भ महाविद्यालय या ठिकाणी क्रीडा सुविधांची पूर्तता होत असून शहरातील लहान -मोठ्या मैदानाचा विकास, चैनलिंग फेन्सिंग, वॉकिंग ट्रॅक ,ओपन जिम आदींची सोय विशेषत्वाने केली जात आहे. सद्या दिवाळीच्या सुट्या असून लवकरच शिक्षणाचे दुसरे सत्र आरंभ होणार आहे. त्यामुळे टीचर प्रीमियम लीग मध्ये सहभागी शिक्षकांमध्ये तणावमुक्ती सह नवे चैतन्य व आनंद संचारला असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम वर्गात निश्चितच जाणवणार असल्याचे शुभेच्छापर गौरवोद्गार आमदार महोदयांनी व्यक्त केले.

दरम्यान आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी अंतिम सामन्यातील नोव्हेल इंडियन्स व टीटीएन इलेव्हन संघाच्या खेळाडूंची भेट करून संवाद साधला तसेच ए. पी. जे अब्दुल कलाम ग्राउंड ची पाहणी सुद्धा केली. दरम्यान स्पर्धेतील अंतिम सामना सुरु असतांना नॉव्हेल इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करतांना निर्धारित ६ षटकांमध्ये ३ गड्यांच्या मोबदल्यात ७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करतांना टीटीएन इलेव्हन संघाला ६ षटकांमध्ये ५० धावाच करता आल्या . नॉव्हेल इंडियन्स संघाने २६ धावांनी सामना जिंकत अजिंक्यपद पटकावले. विजेत्या संघाला आ.सौ .सुलभाताई संजय खोडके यांच्या वतीने २२ हजाराचे रोख बक्षीस व ट्रॉपी देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या संघाला ११ हजार रोख व ट्रॉफी बहाल करण्यात आली. तर लीग स्पर्धेत तिसरे स्थान मिळविणाऱ्या डायमंड वारियर्स संघाला ७,७७७ रुपये रोख व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अनेक वैयक्तिक आकर्षक पुरस्कारांची लयलूट सुद्धा स्पर्धकांनावर करण्यात आली.

याप्रसंगी अबरार साबीर, हॅरिस खान, मोईन खान, फाईम मॅकेनिक, नईम भाई चुडी, अजमद पहेलवान, सनी पठाण, बबलू अंपायर, साबीर पहेलवान, दिलबार शाह, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत , सुयोग तायडे, संकेत बोके, तसेच अंपायर गौरव तेटू, आनंद देशमुख, रोहित तराळे, हार्दिक वाणी, अभिजित गायकवाड, राहुल खंडारे, अमित वाकडे, समालोचक शहजाद सिद्दीकी, मोहसीन सर, ऍड. अफरोज खान, आकाश हिवराळे, गणेश ढाले, तनुज मेहरे, कार्तिक भटकर आदींसह शिक्षक खेळाडू, तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *