अमरावतीत कोरोना रुग्ण संख्येत वाढ कायम, 892 नवे रुग्ण, 8 मृत्यू

अमरावती, 
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येतली वाढ कायम आहे. रविवारी दिवसभरात पुन्हा 8 रुग्णांचा मृत्यू झाला तर 892 नवीन रुग्णांची नोंद झाली. 346 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या 31 दिवसात 14 हजार 117 रुग्ण बाधित आणि 96 मृत्यू झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 35 हजार 117 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 5404 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 2 रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले तर 3959 गृह विलगीकरणात आहे. उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत 29 हजार 202 रुग्ण बरे झाले आहे. त्याचे प्रमाण घसरले असून 83.16 टक्क्यांवर आले आहे. 

जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पुन्हा 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अमरावतीच्या अशोक नगर येथील ७० वर्षीय महिला, कॅम्प रोड येथील ८२ वर्षीय पुरुष, द्वारका नगर येथील ७१ वर्षीय पुरुष, मोती नगर येथील ६२ वर्षीय पुरुष, महेंद्र कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ६२ वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ८१ वर्षीय पुरुष, कसबे गव्हाण येथील ५१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आतापर्यंत 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तो दर 1.47 टक्के आहे. नव्याने बाधित झालेल्या 892 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत 2 लाख 25 हजार 265 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 35 हजार 117 जणांचे अहवाल सकारात्मक आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *