या 8 सरकारी बँकांमध्ये आहे तुमचं खातं? 1 एप्रिलच्या आधी ब्रँचमध्ये भेट द्या, नाहीतर.

आपलं अकाउंट या 8 सरकारी बँकांमध्ये असेल तर 1 एप्रिलच्या आधी आपल्या ब्रॉन्चमध्ये एकदा जरूर जाऊन नवे बदल समजून घ्या. 1 एप्रिल 2021 पासून या आठ बँकांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. 1 एप्रिल पासून ग्राहकांना जूने चेक, पासबुक आणि इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कोड (IFSC) इनवॅलिड होणार आहेत.

जर तुमचं खातं देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (UBI), सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉरपोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक मध्ये असेल तर 1 अप्रिलनंतर तुम्हाला अडचणी होऊ शकतात. कारण या बँकांचे जूने चेकबुक काही कामाचे राहणार नाहीत.

1 एप्रिल पासून या 8 बँकांमध्ये जून्या चेकद्वारे व्यवहार बंद करण्यात येतील. म्हणून मार्च महिन्यात चेक बुक बदलून घेणे आवश्यक आहे, या आठ बँकांनी आपल्या ग्राहकांना सतत मेसेज आणि मेल करून चेक बुक, पासबुक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलून घेण्याचे अपील करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षात 8 सरकारी बँकांचे अस्तित्व संपले आहे. या बँकांचे दुसऱ्या सरकारी बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. देना बँक आणि विजया बँक यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आलं आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडियाचं (UBI) पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आलं आहे.

तर आंध्र बँक आणि कॉरपोरेशन बँक यांचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं आहे. अलाहबाद बँकेचं इंडियन बँकेत विलीनीकरण करण्यात आलं आहे. केवळ सिंडिकेट बँक वगळून अन्य सर्व बँकांचे चेकबुक्स 31 मार्च 2021 नंतर व्यवहारातून रद्द होतील. फक्त सिंडिकेट बँकेचे जूने चेक 30 जून 2021 पर्यंत व्यवहारात राहतील.

विलीनीकरण झालेल्या बँकेत ग्राहकांनी उपलब्ध चेकबुक, पासबुकने केवळ 31 मार्चपर्यंतच कामे होतील. 8 बँकांच्या ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी त्वरित शाखेत जाऊन चेकबुक बदलून घ्या. नवे चेकबुक मिळण्यासाठी सात दिवसांचा वेळ लागेल, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *